Advertisement

Mumbai rains: मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस

विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळं मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.

Mumbai rains: मुंबईत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
SHARES

मुंबईत शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाने (mumbai rains) हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळं मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. शिवाय, सकाळी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना या पावसामुळं अनेक त्रासांना समोर जावे लागत आहे. शिवाय काही भागात पाणी साचलं असल्यानं रस्ते वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे.

भारतीय हवामान विभागानं मुंबईसह राज्यातील इतर भागात सकाळपासून पावसानं (Mumbai Rains) हजेरी लावली आहे. हवामान खात्याने ९ ते १३ जूनदरम्यान मुंबई आणि कोकण परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबई आणि कोकणमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बुधवारी मुसळधार पावसानं मुंबईला चांगलंच झोडपुन काढलं. मुसळधार पावसामुळे मुंबई पुन्हा एकदा तुंबलेली पाहायला मिळाली. मुंबईतील सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले होते.

दरम्यान, या मुसळधार पावसाचा फटका चाळीत राहणाऱ्या जुन्या इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. कारण या पावसामुळं मुंबईत मालाड व दहिसर परिसरात इमारती कोसळल्या व यामध्ये अनेकांचा मृत्य झाला.



हेही वाचा - 

रेमडेसिविर लहान मुलांना नका देऊ; आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाइन्स जारी

मालाड मालवणी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये - मुख्यमंत्री

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा