Advertisement

मुंबईबाहेरील खासगी रुग्णालयांना लसीकरण कॅम्प घेण्यास मनाई- महापालिका आयुक्त

मुंबईत लसींचा पुरवठा उपलब्ध झाल्यापासून मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. अनेक महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण कॅप सुरु करण्यात आलं आहेत.

मुंबईबाहेरील खासगी रुग्णालयांना लसीकरण कॅम्प घेण्यास मनाई- महापालिका आयुक्त
SHARES

मुंबईत लसींचा पुरवठा उपलब्ध झाल्यापासून मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. अनेक महापालिकेच्या आणि खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण कॅप सुरु करण्यात आलं आहेत. मात्र महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिलेल्या सूचनेनुसार, मुंबईबाहेरिल खाजगी रुग्णालयांना शहरात लसीकरण कॅम्प घेण्यास मनाई आहे.

लसीकरणानंतर लस घेतलेल्या लाभार्थ्यांला काही झाल्यास कोणतीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्यास त्याला रुग्णालायात हलवणं कठीण होतं. त्यामुळं शहरातील खासगी लसीकरण कॅम्प घेण्यास मनाई असल्याचं आयुक्तांनी सांगितलं. महापालिकेच्या, राज्य आणि खासगी लसीकरण केंद्राच्या जागेवर कोणत्याही राजकीय पक्ष होर्डिंग,बॅनर व पोस्टर लावू शकत नाहीत. अनेक राजकीय लोकांनी मोठ्या हाऊसिंग सोसाट्यांमध्ये लसीकरण कॅम्प आयोजित केले होते या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

लसीकरण मोहिमेचे राजकारण करु नये असंही आयुक्तांनी सांगितलं. याआधी देखील प्रभाग स्तरातील अधिकाऱ्यांना लसीकरण केंद्रावर कोणत्याही प्रकारचे राजकीय बॅनर न लावण्याचे आदेश देण्यात आले होते. पुन्हा असा प्रकार आढळल्यास नोटीस बजावली जाईल असे आयुक्तांनी सांगितले.

खासगी लसीकरण केंद्र आणि कोणत्याही कामाची जागा किंवा गृहनिर्माण संस्था यांच्यात कोणत्याही प्रकारचा करार झाल्यास त्या लसीकरण केंद्रावर काम करत असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्या आणि AEFI रुग्णवाहिकांची संपूर्ण माहिती देणे आवश्यक आहे, असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.

(Private hospitals outside Mumbai are not allowed to conduct vaccination camps, Municipal Commissioner Iqbal Singh Chahal informed)



हेही वाचा -

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा