Coronavirus Updates: पश्चिम रेल्वेची एसी लोकल बंद

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. गेल्या १२ तासांत राज्यात ७ जणांची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानं धोका वाढला आहे. सध्यस्थितीत राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४९ वर गेली आहे. त्यामुळं सर्वांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नुकताच झालेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अनावश्यक गर्दी करू नका, घरातून काम असेल तरचं बाहेर पडा, काळजी घ्या असं आवाहनं केलं आहे. अशातचं आता हा संसर्ग वाढू नये यासाठी मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनानं देखील खबरदारी घेतली आहे.

पश्चिम रेल्वेनं गुरूवार संध्याकाळपासून एसी लोकल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, सामान्य लोकल सुरूच राहणार आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पश्चिम रेल्वेनं हा निर्णय घेतल्याची माहिती मिळते. त्याचप्रमाणं, मध्य रेल्वेनं देखील ठाणे ते वाशी या ट्रान्स हार्बर मार्गावर धावणारी एसी लोकल सेवा २० मार्च ते ३१ मार्चपर्यंत बंद केली आहे. 

आरोग्यमत्री राजेश टोपे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, अनावश्यक गर्दी करू नका, शक्य असल्यास लोकलमधील गर्दी कमी करा असं आवाहन केलं आहे. त्याशिवाय, रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास लोकल बंद करणं हाच शेवटचा उपाय असेल, असं राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं.

लोकांमध्ये कोरोनाची धास्ती असतानाच मुंबईतून दिल्लीकडे जाणाऱ्या गरीबरथ ट्रेनमध्ये हातावर विलगीकरणाचा शिक्का असलेल्या चौघा प्रवाशांना पाहून सहप्रवासी धास्तावले. तिकीट तपासणींनाही ही बाब समजताच त्यांनी या प्रवाशांना रेल्वेनं प्रवास करण्यास मज्जाव केला आणि पालघर इथं रेल्वे थांबवून चौघांनाही गाडीतून उतरवलं. विलगीकरण करण्यात आलेले प्रवासी सहज फिरकत असल्यानं इतर नागरिकंमध्ये भीती निर्माण झाली आहे.


हेही वाचा -

Coronavirus Updates: अनावश्यक गर्दी टाळा, ट्रेन, बस बंद करण्याची वेळ आणू नका- मुख्यमंत्री

Coronavirus : वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फेसबुकची मोठी घोषणा


पुढील बातमी
इतर बातम्या