Advertisement

coronavirus : वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फेसबुकची मोठी घोषणा

घरून काम करणाऱ्यांसाठी फेसबुकनं घेतला हा मोठा निर्णय

coronavirus : वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी फेसबुकची मोठी घोषणा
SHARES

सध्या जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. जगभरात या व्हायरसमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ४७ वरगेला आहे. त्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून काही कंपन्यांमध्ये वर्क फ्रॉम होम सुरू करण्यात आला आहे. तर काही ऑफेससमध्ये ५०-५० चा फॉर्म्युला अमलात आणला जातोय.    


फेसबुकची मोठी घोषणा

अ‍ॅपल, गुगल, ट्विटर आणि फेसबुक सारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी देखील कोरोना व्हायरसमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितलं आहे. मात्र फेसबुकनं नुकतीच एक घोषणा केली आहे की, घरून काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना १ हजार डॉलर म्हणजेच ७४ हजार रुपये बोनस देण्यात येईल.


'इतके' कर्मचारी वर्क फ्रॉम होम

सध्या फेसबुकचे जवळपास ४५ हजार कर्मचारी घरून काम करत आहेत. तर काही कर्मचारी कंत्राटीवर काम करत आहेत. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सर्व कर्मचाऱ्यांना ईमेल पाठवला आहे. ज्यात बोनस आणि कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालेल्या छोट्या उद्योगांच्या मदतीसाठी ३० देशांच्या जवळपास ३० हजार छोट्या उद्योगांना ७४१ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.


कार्यालयं बंद

काही दिवसांपुर्वीच एका कर्मचाऱ्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर कंपनीनं भारत, सिंगापूर आणि लंडन इथली कार्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, ज्या कर्मचाऱ्याला व्हायरसचा संसर्ग झाल्याचं आढळलं, तो २३ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान लंडन कार्यालयात गेला होता. त्यामुळे सतर्कता दाखवत कार्यालय स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील सर्व कर्मचारी घरून काम करत आहेत.



हेही वाचा

Coronavirus Updates: मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा ३१ मार्चपर्यंत बंद

Coronavirus Updates: मुंबई, उल्हासनगरमध्ये आणखी 2 रुग्ण

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा