आजपासून पूर्ण क्षमतेनं धावणार मुंबई लोकल

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या जवळपास १९ महिन्यांपासून मर्यादित क्षमतेनं धावणारी मुंबई लोकल ट्रेन गुरुवार, २८ ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेनं धावत आहे. यासह, आता ज्या लोकांनी दोन्ही कोरोना लसी घेतल्या आहेत त्यांना मासिक पास देखील मिळू लागले आहेत.

महत्त्वाच्या क्षेत्रातील आणि सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी संपूर्ण लसीकरण करावं लागणार आहे. यासंदर्भात नुकताच निर्णय घेण्यात आला.

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी संपूर्ण लसीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. या संदर्भात महाराष्ट्र शासनानं नुकताच निर्णय घेतला आहे.

सध्या आपत्कालीन सेवा विभागातील लोकांना लसीकरणाची स्थिती विचारात न घेता पास दिले जातात. जेणेकरून लोकांना पुरवल्या जाणाऱ्या अत्यावश्यक सेवांवर परिणाम होणार नाही. मात्र आता शहरात लसीकरण सुरू होऊन बराच काळ लोटला असल्याचं सरकारचं मत आहे. त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घ्यावे लागतील आणि प्रत्येकानं मास्क घालणंही बंधनकारक असेल.


हेही वाचा

सर्वांना लोकलनं प्रवास करू देण्याची मागणी, हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना खडसावलं

वाहनांसाठी नवी नियमावली, चिमुकल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्राचा प्रस्ताव

पुढील बातमी
इतर बातम्या