Advertisement

मास्क न घालणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत घट

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मास्क न घालणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.

मास्क न घालणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत घट
SHARES

लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल केल्यानंतर उपनगरीय लोकल गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. असं असलं तरी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मास्क न घालणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये, पश्चिम रेल्वे (WR) मार्गावर १ हजार ३९५ प्रवाशांना मास्कशिवाय प्रवास केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता. तर सप्टेंबरमध्ये १ हजार ६०६ प्रवाशांना दंड आणि ऑगस्टमध्ये 1,816 प्रवाशांना दंड करण्यात आला. WR ने ऑक्टोबरमध्ये मास्कशिवाय प्रवास करणाऱ्या लोकांकडून १.६४ लाखांचा दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वे (CR) मार्गावर, ऑक्टोबरमध्ये २४० प्रवाशांना मास्कशिवाय प्रवास केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आणि त्यांच्याकडून एकत्रितपणे ४८ ००० वसूल करण्यात आले. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत या मार्गावर २ हजार ३४२ प्रवाशांना दंड ठोठावण्यात आला आहे.

“मास्कशिवाय प्रवास करणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली आहे. बनावट अत्यावश्यक कामगारांच्या ओळखपत्रांवर प्रवास करणाऱ्यांमध्येही घट झाली आहे. आम्ही दोन्ही रेल्वे मार्गावर तसंच लोकल ट्रेनच्या आवारात अचानक तपासणी करतो,” असं एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यानं सांगितलं.

महाराष्ट्र सरकारनं जीआरपीला लोकल ट्रेनमध्ये आणि रेल्वे स्टेशनवर मास्कशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंड वसूल करण्याचा अधिकार दिला होता.

दंडाची रक्कम २०० रुपये आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिसूचनेच्या आधारावर मास्क न घालणे आणि थुंकल्याबद्दल नागरिकांवर दंड आकारला जातो.

तथापि, मास्क न घातलेल्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे की नाही याबद्दल प्रवासी संघटना अनिश्चित आहेत आणि त्यांनी रेल्वेला त्याच्या आवारात तपासणी वाढवण्यास सांगितलं आहे.

“लोकल ट्रेनच्या डब्यांमध्ये मास्कशिवाय प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. प्रवाशांची संख्या वाढत असल्यानं रेल्वे आणि पालिकेनं कडक तपासणी केली पाहिजे, ”रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणाले.

महाराष्ट्र सरकारनं कोरोनाव्हायरस निर्बंध शिथिल केल्यामुळे, मुंबईत शाळा, महाविद्यालये आणि प्रार्थनास्थळे पुन्हा उघडण्यास परवानगी देण्यात आली. शहराच्या उपनगरीय रेल्वे मार्गांमध्येही प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

दरम्यान, दोन्ही विभागीय रेल्वे लोकल ट्रेन सेवा २८ ऑक्टोबरपासून १००% क्षमतेत सुरू होणार आहेत. सध्या लोकल ट्रेन ९५% क्षमतेनं कार्यरत आहे.हेही वाचा

लोकल ट्रेन्स बाबत मोठा निर्णय, २८ ऑक्टोबरपासून...

सर्वांना लोकलनं प्रवास करू देण्याची मागणी, हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना खडसावलं

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा