Advertisement

वाहनांसाठी नवी नियमावली, चिमुकल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्राचा प्रस्ताव

त्यानुसार आता टू व्हिलरसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे.

वाहनांसाठी नवी नियमावली, चिमुकल्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं केंद्राचा प्रस्ताव
SHARES

केंद्रीय मोटर वाहन नियमावलीतील नव्या तरतुदींसह केंद्रीय मोटर वाहन कायद्याचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रालयानं पारित केला आहे. अपघातात लहान मुलांचे मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता टू व्हिलरसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे. 

काय आहेत नवे नियम?

१) लहान मुलं मागे बसलेली असताना दुचाकी ४० किमीपेक्षा जास्त वेगानं चालवण्यास मनाई असेल.

२) जर दुचाकीचा वेग ४० किमीपेक्षा वाढला तर ते वाहतूक नियमांचं उल्लंघन समजलं जाईल.

३) प्रस्तावात ९ महिने ते ४ वर्षांपर्यंतच्या मुलांना क्रॅश हेल्मेट घातलं गेलं पाहिजे, याची चालकानं नोंद घ्यावी.

४) वाहतुकीच्या नियमानुसार जर चार वर्षापेक्षा जास्त वयाचा मुलं गाडीवर बसले तर त्याला प्रवासी मानले जाणार आहे.

५) जर एक किंवा दोनजणांसोबत मुलांना बसवलं असेल तर त्याला दंड आकारण्यात येईल. ज

६) नियमांचं उल्लंघन केलं तर १००० रुपयाचा दंड आकारण्यात येईल.

मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार २०१९ साली रस्ते अपघातात ११ हजार १६८ मुलांचा मृत्यू झाला आहे. म्हणजे दिवसाला ३१ मुलांचा मृत्यू झाला आहे. तर २०१८ सालच्या तुलनेत रस्ते अपघातात मुलांच्या मृत्यूच्या प्रमाणात ११.९४ टक्के म्हणजे १ हजार १९१  एवढी वाढ झाली आहे.



हेही वाचा

लोकल ट्रेन्स बाबत मोठा निर्णय, २८ ऑक्टोबरपासून...

लालपरीचा प्रवास महागला! एसटीचे तिकिट दर 'इतक्या' रुपयांनी वाढले

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा