Advertisement

लालपरीचा प्रवास महागला! एसटीचे तिकिट दर 'इतक्या' रुपयांनी वाढले

महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता प्रवासासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

लालपरीचा प्रवास महागला! एसटीचे तिकिट दर 'इतक्या' रुपयांनी वाढले
SHARES

खासगी ट्रॅव्हल्सपाठोपाठ आता एसटी महामंडळानंही तिकीटांच्या (st bus ticket price hike) दरात वाढ केली आहे. एसटी महामंडळानं गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच १७.१७ टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. आज मध्यरात्रीपासून दरवाढ लागू होणार आहे.

इंधनाची झालेली दरवाढ (petrol diesel price hike) आणि दुसरीकडे महागाईनं होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता प्रवासासाठीही जास्त पैसे मोजावे लागणार आहे.

इंधनाच्या दरात झालेली वाढ आणि टायरच्या तसंच गाड्यांच्या सुट्या भागांच्या किंमतीत वाढ याचाच परिणाम की तिकिटाच्या किंमतीत वाढ केली आहे. २५ ऑक्टोबर २०२१ च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान ५ रूपयानं वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळानं दिली आहे.

महामंडळानं भाडेवाढ केली असली तरी रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर ५ ते १० रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.

नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसंच शिवनेरी आणि अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नाही. दुसऱ्या टप्प्यानंतर म्हणजेच ६ किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ ५ रुपयाच्या पटीत आहे.

तसंच ज्या प्रवाशानं आगाऊ आरक्षण केलं आहे, अशा प्रवाशांकडून वाहक सुधारीत तिकिटाच्या रक्कमेची आकारणी करतील, असं महामंडळानं स्पष्ट केलं आहे.

गेल्या ३ वर्षात इंधनाच्या दरात भरमसाठ वाढ झाली आहे. दिवसेंदिवस हे दर वाढत असले तरी एसटी महामंडळानं प्रवासी दर मात्र स्थिर ठेवले होते. अशा परिस्थितीतही एसटी महामंडळानं कुठल्याच प्रवासी वाहतुकीच्या दरात वाढ केलेली नव्हती.



हेही वाचा

सर्वांना लोकलनं प्रवास करू देण्याची मागणी, हायकोर्टानं याचिकाकर्त्यांना खडसावलं

महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार हायटेक फायर बाईक; आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवता येणार

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा