Advertisement

महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार हायटेक फायर बाईक; आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवता येणार

तातडीनं आग बुजविण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात आता हायटेक फायर बाईक दाखल होणार आहेत.

महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार हायटेक फायर बाईक; आगीवर तातडीनं नियंत्रण मिळवता येणार
SHARES

मुंबईत सध्या आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुंबईतील अनेक भागांत जेव्हा आगीच्या घटना घडतात. त्यावेळी घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्या पोहोचायला उशीर होतो. त्यामुळं तातडीनं आग बुजविण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात आता हायटेक फायर बाईक दाखल होणार आहेत.

मुंबईतील दाटीवाटीच्या वस्तीमध्येही शिरून आगीसारख्या दुर्घटनेत तातडीने पोहोचून बचाव कार्य सुरू करणाऱ्या हायटेक फायर बाईक पालिकेच्या अग्निशमन दलात दाखल  होणार आहेत. महापालिकेच्या २४ वॉर्डमधील फायर स्टेशनमध्ये प्रत्येकी एक बाईक ठेवली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईची लोकवस्ती दाटीवाटीची असल्यानं अनेक वेळा मोठमोठे फायर इंजिन-बंब पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळं आगीची तीव्रता वाढते. त्यामुळं अग्निशमन दलात हायटेक फायर बाईक आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे वर्दी मिळाल्यानंतरचा रिस्पॉन्स टाइम कमी होणार आहे.

परिणामी दुर्घटनेच्या तीव्रतेनुसार आवश्यक यंत्रणा वेगाने उपलब्ध करणे शक्य होणार आहे. गाडीवरच दोन पाण्याच्या टाक्या असल्याने पाठीवरून टाकीतून पाणी नेण्याची गरज राहणार नाही. या एका बाईकसाठी पालिका सुमारे १३ लाख रुपये खर्च करणार आहे.

असा होणार फायदा

  • आगीची माहिती मिळताच ही फायर बाईक घटनास्थळी धाव घेईल. 
  • बाईकवर अग्निशमन यंत्रणा असेल.
  • ४० लिटर पाणी, पोर्टेबल फायर सिस्टीम, कम्युनिकेशन सिस्टीम, ३० मीटर होजरील पाइप, फायर पंप, फायर एक्सटिंग्युशर अशी यंत्रणा असेल.
  • भडका उडालेल्या ठिकाणीच छोटय़ा प्रमाणात असताना आग विझविण्यासाठी उपयुक्त.
  • आग लवकर विझविल्याने दुर्घटनेची तीव्रता कमी होणार. 
  • मोठ्या बंबांच्या गाड्यांपेक्षा लवकर पोहोचल्यानं दुर्घटनेची तीव्रता समजणार.
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा