बेस्टची इलेक्ट्रिक बस धावणार मुंबईच्या रस्त्यावर

बेस्टवं प्रवास करणाऱ्या प्रवासकरणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. सोमवारपासून प्रवाशांना बेस्टच्या इलेक्ट्रिक बसमधून प्रवास करता येणार आहे. बेस्टची ही इलेक्ट्रिक बस प्रतिक्षानगर ते सायन या मार्गावर चालविण्यात येणार आहे. तसंच, ३०२ हा या बसचा क्रमांक असणार आहे. ६ वातानुकूलित आणि ४ विनावातानुकूलित इलेक्ट्रिक बसगाड्या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार बेस्ट उपक्रम इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी करणार आहे.

१० इलेक्ट्रिक बसगाड्या

बेस्टच्या ताफ्यात पहिल्या टप्प्यात १० इलेक्ट्रिक बसगाड्या दाखल झाल्या होत्या. परंतु, प्रादेशिक वाहतूक कार्यालयातून परवानगी न मिळाल्यानं या बसगाड्या आगारांमध्येच उभ्या होत्या. मात्र, संबंधित सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानं ही इलेक्ट्रिक बस मुंबईच्या रस्त्यावर धावणार आहे. एलबीएस मार्गावरून सायन ते कुर्ला मार्गावर ही बस चालविण्यात येणार आहे. कमानी, घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप आणि मुलुंड असा या बसचा मार्ग असणार आहे.

चार्जिंग स्टेशन

या इलेक्ट्रिक बसगाडीचं चार्जिंग स्टेशन धारावी बस आगारात असणार आहे. एकदा चार्ज केल्यास ही बस संपूर्ण दिवसभर चालणार आहे. वातानुकूलित बसचं भाडं ६ रुपये प्रति ५ किलोमीटर आणि विनावातानुकूलित बसचं भाडं ५ रुपये प्रति ५ किलोमीटर असणार आहे. वातानुकूलित बसचं कमाल भाडं २५ रुपये आणि विनावातानुकूलित बसचं भाडं २० रुपये असणार आहे.


हेही वाचा -

मुंबईसह उपनगरात गुरुवारपर्यंत संततधार, हवामान विभागाचा अंदाज

‘आरे वाचवा, मुंबई वाचवा’, पर्यावरणप्रेमींच आंदोलन


पुढील बातमी
इतर बातम्या