Coronavirus Updates: बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (State CM Uddhav Thackeray) अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शाळा, कॉलेज यांसह अनेक गर्दीची ठिकाणं बंद ठेवण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं अनेक जण योग्य ती खबरदारी घेऊन घरातून काम (Work From Home) करत आहेत. चाकरमानी प्रवास टाळत असल्यानं बेस्टला त्याचा फटका बसत आहे.

मागील काही दिवसांत त्यांच्या प्रवासी (Passengers) संख्येत ३ टक्क्यांनी घट झाली आहे. बेस्टनं भाडेकपातीचा निर्णय घेतल्यानंतर प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, बेस्टची प्रवासी संख्या ३८ लाखांवर पोहोचली होती. मात्र, सध्या राज्यावर असलेलं कोरोना व्हायरसचं (Coronavirus) सावट यामुळं या आठवड्यांत यात घट झाली आहे.

सोमवारी १ लाख ३९ हजार, तर बुधवारी १ लाख २५ हजार प्रवासी संख्या घटल्याचं समोर आलं आहे. २ मार्चला बेस्ट बसगाड्यांमधून ३२ लाख २७ हजार प्रवाशांनी प्रवास केला. मात्र, ९ मार्च रोजी ३० लाख ८८ हजार लोकांनी प्रवास केला, तर बुधवारी ४ मार्च रोजी ३२ लाख २२ हजार लोकांनी प्रवास केला होता.

ही संख्या ११ मार्च रोजी ३० लाख ९७ हजार झाल्याचं आकडेवारीवरून समोर आलं आहे. रविवारी सार्वजनिक सुट्टी असल्यानं प्रवासी संख्या कमी असते. मात्र, त्यातही गेल्या रविवारी ५७ हजार प्रवाशांची घट झाल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा -

Coronavirus Update: राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३३ वर

Corona Virus :कोरोनाच्या धास्तीने पोलिस ही अलर्ट, ‘मास्क’ लावूनच करणार ड्युटी


पुढील बातमी
इतर बातम्या