बेस्टची खास महिला प्रवाशांसाठी 'तेजस्विनी'!

लोकल ट्रेन आणि बेस्ट बसमध्ये महिलांना कधी बसण्यासाठी जागा मिळत नाही, तर कधी त्यांना गर्दीचा सामना करावा लागतो. याचबरोबर त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही महत्त्वाचा बनला आहे. पण आता रोजच्या भेडसावणाऱ्या या समस्येपासून महिलांची सुटका होणार आहे. कारण बेस्टने महिला प्रवाशांच्या सोयीसाठी ५० 'तेजस्विनी' बसेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, लोअर परेल, मालाड या संभाव्य ठिकाणी विशेषत: रेल्वे स्टेशनच्या बाहेरून महिलांसाठी फेरी बसेस चालवल्या जाणार असल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने नमूद केलं आहे.

बसची वेळ?

गर्दीच्या वेळी या बसेस चालवण्यात येतील -

  • सकाळी ७ ते ११
  • संध्याकाळी ५ ते रात्री ९

ज्या ठिकाणी व्यावसायिक केंद्र अधिक आहेत, अशा मार्गावरून या बसेस चालवल्या जातील. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या बसमध्ये महिला वाहक नेमण्याचेही बेस्ट प्रशासनाचे नियोजन आहे.


हेही वाचा

'या' कारणांमुळे बेस्ट उपक्रम तोट्यात

पुढील बातमी
इतर बातम्या