Advertisement

इलेक्ट्रीक बसचे ७ 'बेस्ट' फायदे

इंधन बचत आणि प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे मुंबईत इलेक्ट्रीक बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

इलेक्ट्रीक बसचे ७ 'बेस्ट' फायदे
SHARES

आर्थिक तोट्यात असणाऱ्या बेस्ट उपक्रमाने इंधन बचतीसाठी 'इलेक्ट्रीक बस' रस्त्यावर उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या 'इलेक्ट्रीक' बसचं उद्घाटन करण्यात आलं. हा कार्यक्रम वडाळा आगारात झाला. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, बेस्ट आयुक्त सुरेंद्र बागडे उपस्थित होते.


दिल्लीकडे पाहून धडा

दिल्लीतील वायू प्रदूषणाचा स्तर धोकादायक पातळीवर पोहोचलेला आहे. यातून मुंबईकरांनी धडा घेण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रदूषणाला आळा घालण्यासाठी बेस्ट उपक्रमाद्वारे इलेक्ट्रीक बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



वाढता इंधन खर्च डोईजड

बेस्टने इंधनावरील खर्च करण्यासाठी सीएनजी बसचा पर्याय स्वीकारलेला असला तरी सीएनजीच्या दरात वाढ होत असल्याने बेस्टचा इंधनावरील खर्चही वाढला आहे. बेस्टच्या ताफ्यात ३,४०० बस आहेत.



  1. शहरात इलेक्ट्रीक बस चालवणारे मुंबई हे राज्यातील दुसरे शहर ठरले आहे. यापूर्वी नागपूरमध्ये इलेक्ट्रीक बस धावण्यास सुरूवात झाली होती.
  2. या बसच्या माध्यमातून प्रदूषणावर मात करण्यासोबतच बेस्ट उपक्रमाच्या इंधन खर्चातही मोठी बचत होणार आहे. बसमध्ये इंजिन आणि गिअर नसल्याने ध्वनी प्रदूषणाली आळा बसेल.
  3. ही बस चार्ज व्हायला ३ तास लागतात. पूर्णपणे चार्ज झाल्यावर बस २०० किमी धावते. पण सध्या या बससाठी बॅकबे आगारातच इलेक्ट्रीक पाॅईंट बसवण्यात आला आहे.
  4. ही बस सीएसटीएम ते चर्चगेट, बॅकबे डेपो ते सीएसटीएम या १३८ क्रमांकाच्या मार्गावर धावेल.
  5. मुंबई महापालिकेच्या पैशातून विकत घेण्यात आलेल्या या इलेक्ट्रीक बसची किंमत प्रत्येकी १.६१ कोटी रुपये इतकी आहे. म्हणजे आताच्या बसच्या दुप्पट.
  6. महापालिकेने बेस्ट उपक्रमाला बसच्या खरेदीसाठी १०० कोटी रुपये दिले होते. त्यापैकी ९० कोटी रुपये खर्च करून १८५ साध्या आणि १० कोटी रुपये खर्च करून इलेक्ट्रीक बस विकत घेण्यात आल्या आहेत.
  7. बसची प्रवासी क्षमता ३० प्रवाशांची आहे. या बसचं भाडं सीएनजी बसच्या भाड्याएवढंच असेल, अशी माहिती बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा