धुलिवंधनाच्या दिवशी बेस्टच्या बसगाड्यांमध्ये कपात

महाशिवरात्र, रक्षाबंधन, गणेशोत्सव, ईद, भाऊबीज या सणांच्या दिवशी मुंबईमध्ये बेस्ट उपक्रमातर्फे जादा बसगाड्या सोडण्यात येतात. या सणांच्या दिवशी प्रवाशीं गैर सोय होऊ नये यासाठी जादा बसगाड्या सोडल्या जातात. मात्र, होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलिवंदनाच्या दिवशी प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे बेस्ट प्रशासनाने गुरुवारी बसगाड्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

बसगाड्यांमध्ये कपात

बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या निर्णायानुसार, धुलिवंधनाच्या दिवशी उपक्रमाच्या अनुसूचित बसगाड्यांमध्ये कपात करण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी एकूण १८४२ अनुसूचित गाड्यांंपैकी ९६० बसगाड्या व दुपारी २१९१ अनुसूचित बसगाड्यांपैकी १२३४ बसगाड्या प्रवर्तित करण्यात येणार आहेत. 


हेही वाचा -

'असं' आहे आयपीएलचं वेळापत्रक!

'मनसेनं लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावं', विनोद तावडेंचं राज ठाकरेंना आव्हान


पुढील बातमी
इतर बातम्या