महालक्ष्मीच्या दर्शनासाठी बेस्टच्या जादा बस

मुंबईतील प्रसिद्ध मंदिरांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिरात दरवर्षी नवरात्रीमध्ये मोठ्या संख्येने भक्त दर्शानासाठी येतात. अशा भक्तांच्या सोईसाठी बेस्ट उपक्रमातर्फे २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.

एकूण २० ज्यादा बस  

बसमार्ग क्र. ३३, ३७, ५७, ६३, ८३, १२४, १५१, आणि ३५७ तसेच संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) ते महालक्षमी मंदिर दरम्यान ८१११ क्रमांकाची महालक्ष्मी विशेष बस चालवण्यात येईल. या बसमार्गावर एकूण २० ज्यादा बस सोडण्यात येतील. तर दसऱ्याच्या दिवशी भायखळा स्थानक पश्चिम ते महालक्ष्मी मंदिर दरम्यान बस ३ जादा बसगाड्या चालवण्यात येतील.

प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टतर्फे वत्सलाबाई देसाई चौक (हाजीअली), वसंतराव नाईक चौक (ताडदेव), जे. मेहता मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (प.), महालक्ष्मी रेल्वे स्थानक आणि महालक्ष्मी मंदिर येथील बस स्थानकांवर बसनिरीक्षकांची आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल.


हेही वाचा - 

मुंबईकरांसाठी 'बेस्ट'च्या जादा बसेस


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या