Advertisement

माऊंट मेरी जत्रेसाठी बेस्टच्या ज्यादा बस


माऊंट मेरी जत्रेसाठी बेस्टच्या ज्यादा बस
SHARES

येत्या रविवारपासून सुरू होणाऱ्या माऊंट मेरी जत्रेसाठी बेस्ट उपक्रमातर्फे आठवडाभर ज्यादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. वांद्रे पश्चिमेकडील माऊंट मेरी चर्च येथे दरवर्षी ही जत्रा भरविण्यात येते.

वांद्रे परिसरात कॅथलिक समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. त्याचबरोबर या जत्रेला मुंबई आणि मुंबई बाहेरूनही भाविक येतात. या काळात भाविकांची परिसरात मोठी गर्दी होत असल्याने त्यांना हिलरोड येथे जाण्यास पुरेशी वाहन व्यवस्था उपलब्ध होत नाही.

अशा भाविकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे ज्यादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार वांद्रे पश्चिम बसस्थानक ते हिलरोड दरम्यान ज्यादा बस गाड्या चालविण्यात येतील.१० सप्टेंबरपासून होणाऱ्या बसच्या वाढीव फेऱ्या

वांद्रे (प) बसस्थानक ते हिलरोड

  • रविवार - सकाळी २५, संध्याकाळी २३
  • सोमवार - सकाळी १२ , संध्याकाळी १६
  • मंगळवार- सकाळी १२, संध्याकाळी १६
  • बुधवार- सकाळी १७, संध्याकाळी २१
  • गुरुवार- सकाळी १२, संध्याकाळी १६
  • शुक्रवार- सकाळी १७, संध्याकाळी २१
  • शनिवार- सकाळी २८, संध्याकाळी २८
  • रविवार- सकाळी ४२, संध्याकाळी ५२

अशा प्रकारे संपूर्ण आठवडाभर प्रत्येक दिवशी ज्यादा बस गाड्या सोडण्यात येणार आहेत.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement