उपोषणाला बसलेले शशांक राव यांची प्रकृती बिघडली, केईएममध्ये दाखल

बेस्ट कामगारांच्या विविध मागण्यांसाठी वडाळा आगारासमोर बेमुदत उपोषणाला बसलेले कामगार नेते शशांक राव यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने परळच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या ५ दिवसांपासून बेस्ट प्रशासनासोबत वाटाघाटी करूनही तोडगा न निघाल्याने कामगारांनी बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे.  

मागण्या काय?

त्यानुसार मागील ३ दिवसांपासून बेस्ट कामगार आणि बेस्ट कृती समितीचे नेते वडाळा आगारात उपोषणाला बसले आहेत. उपोषण सुरू असताना राव यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना केईएम रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक २० मध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्रलंबित वेतनकरार, बेस्ट अर्थसंकल्पाचं महापालिका अर्थसंकल्पात विलिनीकरण, दिवाळी बोनससह अन्य मागण्या बेस्ट प्रशासनाने तात्काळ मान्य कराव्यात अशी त्यांची मागणी आहे.  

संपावर ठाम

बेस्ट प्रशासनाने कामगारांच्या मागण्या मान्य न केल्यास संप करायचा की नाही यावर बेस्टच्या २७ आगारांत समितीतर्फे मतदान घेण्यात आलं होतं. या मतदानात १७ हजार, ४९७ कामगारांनी संप करण्यास पाठिंबा दिला; तर, ३६८ कामगारांनी संप न करण्याच्या बाजूने मत दिलं. आधी वडाळा आगारासमोर लक्षवेळी धरणं-आंदोलन केलं जाईल आणि त्यानंतरच संपावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. असं शशांक राव यांनी स्पष्ट केलं होतं. 


हेही वाचा-

मागण्यांबाबत चर्चा फिस्कटली, उपोषण कायम- शशांक राव

उद्धव ठाकरेंची मध्यस्थी निष्फळ, बेस्ट कामगारांचं बेमुदत उपोषण सुरु


पुढील बातमी
इतर बातम्या