Advertisement

उद्धव ठाकरेंची मध्यस्थी निष्फळ, बेस्ट कामगारांचं बेमुदत उपोषण सुरु


उद्धव ठाकरेंची मध्यस्थी निष्फळ, बेस्ट कामगारांचं बेमुदत उपोषण सुरु
SHARES

बेस्ट कामगारांच्या वेतन कराराचा प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिष्टाई केली होती. मात्र ती अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे बेस्ट कामगारांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून, बेस्ट प्रशासनाने आमचा अंत पाहू नये नाहीतर कामगारांनी दिलेला संप पुकारण्याचा कौल वापरण्यात येईल असा इशारा बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने दिला आहे. 

उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यामुळे उपोषण सुरु करण्यात आले आहे. वेतन कराराच्या प्रश्नाबाबत १९ हजार कर्मचाऱ्यांनी संपाच्या बाजूने कौल दिला आहे. प्रलंबित वेतन करार, अर्थसंकल्पाचे विलीनीकरण, दिवाळीचा बोनस आणि अन्य मागण्यांसाठी संप करण्याचा कौल बेस्टमधील १९ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी मतदानाद्वारे दिला असून मागण्यांची पूर्तता न झाल्यास बेस्टमध्ये संप होण्याची चिन्हे आहेत.कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी पुन्हा एकदा संप करावा का यासाठी कृती समितीने शुक्रवारी कर्मचाऱ्यांचे मतदान घेतले. कृती समितीने शनिवारी मतमोजणी केली. सुमारे १७ हजार ९२५ कर्मचाऱ्यांनी मतदान केले असून १७ हजार ४९७ म्हणजे ९८ टक्के कर्मचाऱ्यांनी संप करण्याच्या बाजूने कौल दिला. 

मतदाननंतर कामगारांनी वडाळा आगाराबाहेर धरणे आंदोलन केल होत. मात्र, तोडगा न निघाल्यानं कामगारांनी आता उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा मोठ्या त्रासाला समोर जाण्याची शक्यता आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा एप्रिल २०१६ पासून प्रलंबित असलेला वेतनकरार तातडीनं करण्यात यावा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात, पालिका अर्थसंकल्पात बेस्ट अर्थसंकल्पाचे विलीनीकरण, पालिका कामगारांप्रमाणेच बोनस आदी प्रमुख मागण्यांसाठी कृती समिती आक्रमक आहे.हेही वाचा-

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मंगळवारी लागणार निकाल

'या' मागण्यांसाठी महापालिका कर्मचाऱ्यांचा संपाचा इशाराRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा