एलबीएस रोडचा पालिका करणार पुन्हा विस्तार

  • मुंबई लाइव्ह टीम & नवनाथ भोसले
  • परिवहन

पादचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुन्हा एकदा १३ किलोमीटरचा एलबीएस रोड नवीन  बनवण्याची तयारी मुंबई महापालिका करत अाहे. या रस्त्याचा अाराखडा पुन्हा पालिका तयार करणार अाहे. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अन्य १३ जंक्शनच्या ठिकाणीही बदल केले जाणार अाहेत.

३.५ मीटरची प्रत्येक मार्गिका

बीएमसी अधिकाऱ्यांनी माहिती दिली की,  एलबीएस रोडच्या विस्तारित कामामध्ये ब्लूमबर्ग इनिशिएटिव फोर ग्लोबल रोड सेफ्टी (बीआयजीआरएस) अंतर्गत तज्ज्ञांनी प्रस्तावित केलेली अभियांत्रिकी रचनांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला अाहे. एलबीएस रोडच्या विस्तार अाणि नुतनीकरणात ३.५ मीटरची प्रत्येक मार्गिका तयार करण्यात येणार अाहे. याशिवाय दोन लोक चालतील असा २ मीटरचा फूटपाथ ठेवण्यात येणार अाहे. पालिकेचे मुख्य अभियंता (रस्ते अाणि वाहतूक) विनोद चितोरे यांनी म्हटंल की, १३ किलोमीटरच्या एलबीएस रोडचा पुन्हा अाराखडा तयार केला जाणार अाहे. 


हेही वाचा - 

महापालिका म्हणते १ हजार ४२५ मॅनहोल्सला बसवल्या जाळ्या

गुड न्यूज! एसी लोकलच्या भाडेवाढीला स्थगिती


पुढील बातमी
इतर बातम्या