Advertisement

गुड न्यूज! एसी लोकलच्या भाडेवाढीला स्थगिती

पश्चिम रेल्वेनं एसी लोलकमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुड न्यूज देत भाड्यात वाढ न करण्याचं ठरवलं आहे. पुढील ६ महिन्यांपर्यंत एसी लोकलचं भाडं वाढणार नसल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं अाहे.

गुड न्यूज! एसी लोकलच्या भाडेवाढीला स्थगिती
SHARES

सुरूवातीला सुपरफ्लाॅप ठरलेल्या, पण उन्हाळ्यात सुपरडुपर हिट ठरलेल्या एसी लोकलचं भाडं २५ जूनपासून वाढण्याचे संकेत मिळाल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार होती. पण पश्चिम रेल्वेनं एसी लोलकमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गुड न्यूज देत भाड्यात वाढ न करण्याचं ठरवलं आहे. पुढील ६ महिन्यांपर्यंत एसी लोकलचं भाडं वाढणार नसल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलं अाहे. पुढील सहा महिन्यांसाठी एसी लोकलच्या भाडेवाढीला स्थगिती दिल्याचं पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी गजानन महादपूरकर यांनी स्पष्ट केलं.


'इतकं' अाहे भाडं

सोमवार ते शुक्रवारदरम्यान विरार ते चर्चगेट धावणाऱ्या एसी लोकलचं भाडं कमीत कमी ६० रुपये अाणि जास्तीत जास्त २०५ रुपये अाहे. तर विरार ते चर्चगेटदरम्यान एका महिन्याच्या पासची किंमत २००० रुपयांपेक्षा जास्त अाहे. २५ जुनपासून एसी लोकलची भाडेवाढ होणार होती. पण सहा महिन्यांकरिता ही भाडेवाढ पुढे ढकलण्यात अाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला अाहे.


प्रवासी वाढवण्याचा प्रयत्न

२८ डिसेंबर २०१७ रोजी सुरू झालेल्या एसी लोकलला पहिले २ महिने प्रवाशांचा फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. पण उन्हाळ्यात घामाच्या धारांनी भिजलेल्या प्रवाशांना एसी लोकलनं सुखद गारवा दिला. अाता पावसाळा असल्याने प्रवाशांच्या संख्येत घट होईल, अशी भीती पश्चिम रेल्वेला वाटत असावी. म्हणूनच प्रवासीसंख्या कायम राखण्यासाठी परिणामी ती वाढविण्यासाठी पश्चिम रेल्वेनं ही भाडेवाढ पुढे ढकलल्याचं समजतं.



हेही वाचा-

उन्हाळ्यात एसी लोकल फुल्ल, रेल्वे प्रशासन झालं खूश

शनिवारीदेखील धावू शकते एसी लोकल!



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा