मध्य रेल्वे उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (central railway) मुंबई (mumbai), पुणे, सोलापूर, नाशिक रोड आणि नागपूर येथून विविध ठिकाणापर्यंत 2012 उन्हाळी विशेष गाड्या (special trains) चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

याव्यतिरिक्त आणखी 120 विशेष गाड्या मागणीनुसार चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापैकी काही गाड्यांचे आरक्षण आजपासून सुरू झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - मडगाव - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष गाडीच्या 18 सेवा चालविण्यात येतील.

ट्रेन क्रमांक 01171 ही साप्ताहिक विशेष गाडी 16 एप्रिल ते 11 जून या कालावधीत सीएसएमटी येथून दर गुरुवारी रात्री 12.20 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुपारी 3.15 वाजता पोहोचेल.

या गाडीच्या 9 सेवा तर ट्रेन क्रमांक 01172 ही साप्ताहिक विशेष गाडी 16 एप्रिल ते 11 जून या कालावधीत मडगाव येथून दर गुरुवारी सायंकाळी 4 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे पहाटे 3.45 वाजता पोहोचेल. या गाडीच्या 9 सेवा चालविण्यात येतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव- लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्याच्या 18 सेवा चालविण्यात येतील.

17 एप्रिल ते 12 जून या कलावधीत या गाड्या चालविण्यात येतील. अशा विविध सेवा चालविण्यात येणार आहेत.

3 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत 14 सेवा 'मागणीनुसार विशेष गाड्या' म्हणून, आणि 17 एप्रिल ते 2 मे या कालावधीत 16 सेवा 'उन्हाळी विशेष गाड्या' म्हणून चालवण्यात येतील.


हेही वाचा

खार दांडा कोळीवाडा जमिनीचा वाद मिटवण्याचे हायकोर्टाचे आदेश

गुढीपाडव्यानिमित्त उद्या गिरगाव, कुर्ला, दादर येथे चित्ररथ

पुढील बातमी
इतर बातम्या