मध्य रेल्वेवरून धावणार 24 नवीन लोकल

बहुप्रतिक्षित बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. प्रवाशांच्या वाढत्या आकडेवारीनुसार मध्य रेल्वेत नवीन लोकल कधी दाखल होणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र येत्या काही महिन्यांत 24 नवीन लोकल दाखल होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याकडून देण्यात आली आहे. पण या गाड्या मध्य रेल्वेच्या नेमक्या कोणत्या मार्गावरून धावणार? हे मात्र अजून सांगण्यात आलेले नाही.

मध्य रेल्वेकडून सीवूड ते उरण असा नवीन मार्ग बांधला जात असून त्याचे काम 2019 पर्यंत पूर्ण केले जाईल. एकूण 27 किलोमीटरचा असलेल्या या मार्गात अकरा स्थानके आहेत. या मार्गावरही 24 पैकी काही नवीन लोकल चालवण्याचा विचार केला जात आहे. मध्य रेल्वे मार्गावर सध्या 122 लोकल धावत असून त्याच्या 1,600 पेक्षा अधिक फेऱ्या होतात. सध्या धावत असलेल्या लोकलमध्ये सिमेन्स, रेट्रोफिटेड आणि भेल या कंपन्यांच्या लोकल आहेत.

बम्बार्डियरच्या नवीन लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या असून सिमेन्स लोकल टप्प्याटप्याने मध्य रेल्वेकडे दाखल झाल्या आहेत. तरीही मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवर जुन्या लोकलही धावत आहेत. एका लोकलचे आयुर्मान हे 25 वर्ष असते. अशा 25 वर्ष होत असलेल्या काही लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावत आहेत.

चैन्नईतील रेल्वेच्या इंटिग्रल कोच फॅक्ट्रीत नव्या लोकलची बांधणी होत असून येत्या काही महिन्यांत त्या मुंबईत दाखल होतील. सध्या मध्य रेल्वेकडे 13 जुन्या लोकल धावत असून त्या बदलून नव्या 13 लोकल चालवल्या जातील. या लोकल कोणत्या मार्गावर चालवायचा याचे नियोजन सुरू आहे.

डी. के. शर्मा, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे


हेही वाचा -

मुंबईत येणार संपूर्ण भारतीय बनावटीची लोकल

भारतीय बनावटीची पहिली 'मेधा एक्स्प्रेस'


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या