मुंबईत येणार संपूर्ण भारतीय बनावटीची लोकल

 Mumbai
मुंबईत येणार संपूर्ण भारतीय बनावटीची लोकल

मुंबई - मागील काही महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेली भारतीय रेल्वेची संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिलीवहिली 'मेधा लोकल' येत्या शनिवारी पश्चिम रेल्वेच्या सेवेत येणार आहे. त्यामुळे भारतीय बनावटीच्या मेधा लोकलचा प्रवास आता मुंबईकरांना अनुभवता येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या लोकलला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.

ही लोकल बम्बार्डियरसारखीच असून, त्यातील संपूर्ण विद्युत यंत्रणा हैदराबाद येथील मेधा सर्वोड्राइव्ह या कंपनीने तयार केली आहे. यंत्रणा सिमेन्स किंवा बम्बार्डियर या परदेशी कंपन्यांसारख्या असून, या संपूर्ण लोकलची किंमतही या परदेशी बनावटीच्या गाड्यांपेक्षा कमी आहे. 

लोकलच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्यानतंर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या गाडीचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला होता. त्यामुळे आता या दोन्ही लोकलचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शनिवारी अखेर मेधा लोकल पश्चिम रेल्वेच्या सेवेत येणार आहे. या गाडीमध्ये वेगळ्या यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. आपात्कालीन संपर्क प्रणाली, ध्वनीविस्तारक यंत्र, मोटरमन आणि गार्ड यांच्याशी संपर्क तर साधता येणारच आहे.

Loading Comments