भारतीय बनावटीची पहिली 'मेधा एक्स्प्रेस'

 Mumbai
भारतीय बनावटीची पहिली 'मेधा एक्स्प्रेस'

मुंबई - मेड इन इंडिया या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली पहिली अंत्योदय सुपरफास्ट आणि संपूर्ण भारतीय बनावटीची मेधा लोकल ट्रेन शनिवारपासून सुरू करण्यात आली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. हा कार्यक्रम लोकमान्य टिळक टर्मिनस येथे झाला. मुंबईतील चर्चगेट ते लोकमान्य टिळक टर्मिनस असा पहिला प्रवास या लोकलने केला. पश्चिम रेल्वेवर ही गाडी धावणार आहे.

चेन्नईच्या आयसीएफ कारखान्यात अशा प्रकाराचे दोन लोकल रेक तयार करण्यात आलेत. दोन वर्षांपूर्वी दाखल झालेल्या बंबार्डियर लोकलसारखीच ही गाडी दिसत असली, तरी ही पूर्णतः देशी बनावटीची लोकल आहे. हैदराबादच्या मेधा सर्वोड्राईव्ह या कंपनीनं गाडीची संपूर्ण विद्युत यंत्रणा तयार केली आहे. या रेकच्या संपूर्ण सुरक्षा चाचण्या झाल्या आहेत. बम्बार्डियर लोकलची किंमत 44 कोटी 36 लाखांपर्यंत जाते. तर, या नव्या 'मेधा लोकल'ची किंमत 42 कोटी 23 लाख रुपयांच्या घरात आहे.

Loading Comments