मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर, पंजाब मेल मुंबईच्या दिशेने रवाना

मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येत आहे. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्येच बंद पडलेली पंजाब मेल मुंबईच्या दिशेने रवाना झाली. मध्य रेल्वेच्या कसारा-आसनगाव मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे.

सकाळी सातच्या सुमारास कसारा-उंबरमाळी स्टेशनदरम्यान पंजाब मेलचे इंजिन बंद पडल्याने मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक दीडतास ठप्प होती. कसऱ्याच्या दिशेने डाऊनमार्गे जाणारी रेल्वे वाहतूक मात्र सुरू होती. शिवाय, पंजाब मेलच्या मागे दोन लोकल आणि एक एलटीटी सुल्तानपूर एक्स्प्रेस रखडल्या होत्या.

त्यामुळे प्रवाशांना पुन्हा एकदा सकाळी-सकाळी मनस्ताप सहन करावा लागला. पण, आता हळूहळू मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर येत आहे. तरीही वेळापत्रकात बदल झाल्याने मुंबईकरांना मात्र याचा फटका बसला आहे.


हेही वाचा -

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळपासूनच प्रवाशांना मनस्ताप

लोकलच्या हँडिकॅप डब्यात चढला अन् फसला... तुम्ही करू नका असं धाडस


पुढील बातमी
इतर बातम्या