Advertisement

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळपासूनच प्रवाशांना मनस्ताप


हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळपासूनच प्रवाशांना मनस्ताप
SHARES

मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. त्यामुळे पनवेलहून मुंबईकडे येणारी वाहतूक काही मिनिटे तरी उशिरा असणार आहे. पनवेलजवळ रुळाला तडे गेल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला.


रेल्वे रुळाला गेले तडे

कार्यालय गाठण्याच्या घाईत असणाऱ्या मुंबईकरांना मात्र याचा सहन करावा लागला. सकाळी 6.20 मिनिटांनी पनवेलहून ठाण्याकडे जाणाऱ्या लोकलच्या मोटरमनला रेल्वे रुळाला तडे गेल्याचे निदर्शनास आले. यावेळी मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकल रुळावरच थांबवली आणि तातडीने याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली.

त्यानंतर रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. याचा परिणाम मात्र सीएसटीएम दिशेने जाणाऱ्या वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात झाला.

रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याने लोकलचे वेळापत्रक मात्र पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे सकाळी 6 वाजल्यापासूनच मुंबईकरांना रेल्वेच्या त्रासाला सामोर जावे लागले.


हेही वाचा -

हार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक विस्कळीत


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा