Advertisement

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, संतप्त प्रवाशांचा रेलरोको


तांत्रिक बिघाडामुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत, संतप्त प्रवाशांचा रेलरोको
SHARES

आज तर लोकल उशिरा नसेल ना... अशी भीती मध्य रेल्वेच्या प्रवासाशांना नेहमीच लागून राहिलेली असते. पण आता हार्बर रेल्वेवरही असेच काहीसे होताना दिसत आहे.

जोरदार पावसामुळे बुधवारी हार्बर रेल्वेची वाहतूक संथ गतीने सुरू होती. पण गुरुवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जेव्हा नोकदार वर्गाला लोकल पकडून कामावर जाण्याची घाई असते त्याचवेळी हार्बर रेल्वेच्या कुर्ला स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे हार्बर मार्गावरील सर्व गाड्या अर्धा तास उशिराने धावत आहेत. लोकल कोलमडल्याने प्रवाशांचा उद्रेक वाढला.

याचदरम्यान काही संतप्त प्रवाशांनी चेंबूर स्थानकात लोकल रोखून धरली. त्यामुळे तेथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकल रद्द करण्यात आली. पण काही काळानंतर ही लोकल सुरू करण्यात आली असली तरी ती 25 मिनिटे उशिरा सुरू असून मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूकही 10 ते 15 मिनिटे उशिरा धावत आहेत. आता ही परिस्थिती हळूहळू आटोक्यात आणण्याचा प्रयत्न लोहमार्ग पोलीस करत आहेत. पण या सगळ्यामुळे हार्बर रेल्वेचे संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे. 

पण ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना काळजी करण्याची गरज नाही कारण या मार्गावरील लोकल सुरळीत सुरू आहेत. 

सकाळच्या वेळी रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने संतप्त प्रवाशांनी ट्विटरवही प्रतिक्रिया दिली आहे







Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा