Advertisement

हार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक विस्कळीत


हार्बर मार्गावर रेल्वे वाहतूक विस्कळीत
SHARES

मुंबईच्या हार्बर मार्गावरील रे-रोड आणि कॉटनग्रीन स्थानकाजवळ लोकलच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पनवेलकडून सीएसटीएमकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. ऐन गर्दीच्यावेळी रेल्वे वाहतूक कोलमडल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला.  

पहाटेपासून मुंबई-ठाणे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती. अशातच हार्बर मार्गावर लोकलचे इंजिन बंद पडल्यामुळे पनवेलहून सीएसटीएमकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळची वेळ असल्याने नोकरदारवर्ग कार्यालय गाठण्यासाठी धडपडत असतो. मात्र अशातच रेल्वे वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. हार्बर रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. पर्याय नसल्याने काही जण बस-टॅक्सी पकडून आपल्या कार्यालयात पोहचण्याच्या प्रयत्नात आहेत.


हेही वाचा - 

लोकलचे डबे घसरले, मध्य रेल्वे विस्कळीत


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा