लोकलचे डबे घसरले, मध्य रेल्वे विस्कळीत

  Pali Hill
  लोकलचे डबे घसरले, मध्य रेल्वे विस्कळीत
  लोकलचे डबे घसरले, मध्य रेल्वे विस्कळीत
  लोकलचे डबे घसरले, मध्य रेल्वे विस्कळीत
  लोकलचे डबे घसरले, मध्य रेल्वे विस्कळीत
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा मध्य रेल्वे रुळांवरून घसरली. सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी कुर्ल्याहून अंबरनाथला निघालेल्या लोकलचे डबे कल्याण-विठ्ठलवाडी स्थानकांच्या दरम्यान घसरले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कल्याण ते अंबरनाथ दरम्यान पूर्णपणे ठप्प झाली आहे. सकाळीच हा प्रकार घडल्यानं मध्य रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. तर पुण्याहून दक्षिणेकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या वाहतुकीलाही या अपघाताचा फटका बसला आहे. वाहतूक पुन्हा सुरू होण्यासाठी किमान 2 तास लागतील, अशी उद् घोषणा मध्य रेल्वेनं सुरू केली होती. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी अंबरनाथ-कर्जत अशी शटल सेवाही तातडीनं सुरू करण्यात आली. कसारा-सीएसटी मार्गावरील वाहतूक मात्र सुरू आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.