महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट बसगाड्यांची विशेष व्यवस्था

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जमणारी गर्दी लक्षात घेता ६ डिसेंबर रोजी बेस्ट प्रशासनातर्फे विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याच अंतर्गत ४ डिसेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान बेस्टच्या बस फेऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

अशा प्रकारे असतील बस फे-या

  • दादर (प) ते शिवाजी पार्क मार्गावर ५ डिसेंबरची संपूर्ण रात्र ते ६ डिसेंबरचा दिवस २४ तास बससेवा सुरु रहाणार
  • बोरिवली रेल्वे स्टेशन(पू) ते कान्हेरी गुफादरम्यान बसमार्ग १८८वर सकाळी ९ ते संध्याकाळी ७ दरम्यान बससेवा
  • मालाड स्टेशन(प) ते मारवे चौपाटीदरम्यान सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत बसमार्ग २७२वर बससेवा
  • बोरिवली स्टेशन (प) ते गोराई खाडीदरम्यान सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत बसमार्ग २४७ आणि २९४वर अतिरिक्त बस चालवण्यात येणार
  • दैनंदिन बसपास - शहरी प्रवासासाठी ४०रू., उपनगरीय प्रवासासाठी ५० रू. आणि एकत्र प्रवासक्षेत्रासाठी ७० रू. बसपास
  • बसपाससाठी असलेल्या आरएफ-आयडी स्मार्ट कार्ड ओळखपत्राची अट ४ डिसेंबर ते ९ डिसेंबरदरम्यान शिथिल करण्यात आली.


हेही वाचा

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या 12 विशेष ट्रेन

पुढील बातमी
इतर बातम्या