Advertisement

शिवाजी पार्कमध्ये वृक्ष छाटणीला सुरुवात


शिवाजी पार्कमध्ये वृक्ष छाटणीला सुरुवात
SHARES

येत्या 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन आणि 6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन या दोन्ही दिवशी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये मोठी गर्दी होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी महापालिकेकडून शिवाजी पार्क परिसराच वृक्ष छाटणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.


मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना

रस्त्याच्या कडेला किंवा काही ठिकाणी तर रस्त्याच्या मधोमध वाढलेल्या झाडांच्या फांद्या डोक्यात पडून मुंबईकर जखमी होण्याच्या घटना अनेकदा समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर 17 नोव्हेंबर आणि 6 डिसेंबर रोजी शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांसाठी महापालिकेने कंबर कसली आहे. या दिवशी जमा होणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षिततेसाठी महापालिका जी उत्तर विभागाच्या गार्डन मेंटेनन्स विभागाकडून शिवाजी पार्क विभागातील वृक्ष छाटणीचे काम सुरू करण्यात आले आहे.

शिवाजी पार्कसारख्या गर्दीच्या ठिकाणी एखादी फांदी पडून कुणाला इजा वैगेरे पोहोचणार नाही, यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

सचिन वारिसे, उद्यान अधिकारी, जी उत्तर विभाग

गेल्या दोन दिवसांपासून छाटणीचे काम सुरु असून छाटलेल्या फांद्या पालिका कर्मचाऱ्यांकडून लगेच उचलल्या जात आहेत, अशी माहिती कनिष्ठ वृक्ष अधिकारी अमित करंदीकर यांनी दिली आहे.



हेही वाचा

पक्ष्यांची घरटी असलेल्या फांद्यांची छाटणी नको!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा