Advertisement

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या 12 विशेष ट्रेन


महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या 12 विशेष ट्रेन
SHARES

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे प्रशासनातर्फे 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 12 विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत.


आनुयायांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मेन लाईनवर दादर ते कुर्ला, ठाणे, कल्याण आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द, वाशी, पनवेल स्थानकांदरम्यान या विशेष ट्रेन चालवण्यात येतील. त्यामुळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे.

6 डिसेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीत लाखोंच्या संख्येने अनुयायी दाखल होतात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय मध्य रेल्वेकडून घेण्यात आला आहे.


मध्य रेल्वे

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर डाऊन दिशेला दादर - ठाणे विशेष लोकल मध्यरात्री 1 वाजून 15 मिनिटांनी, दादर-कल्याण विशेष लोकल मध्यरात्री 2: 25 मिनिटांनी आणि दादर - कुर्ला विशेष लोकल पहाटे 3 वाजता चालवण्यात येईल.


अप दिशेला कुर्ला - दादर विशेष लोकल रात्री 12 वाजून 45 मिनिटांनी, कल्याण - दादर विशेष लोकल रात्री 1 वाजता, ठाणे - दादर विशेष लोकल रात्री 2 वाजून 10 मिनिटांनी सुटणार आहे. 


हार्बर मार्ग

हार्बर मार्गावर डाऊन दिशेला कुर्ला - मानखुर्द विशेष लोकल रात्री 2 वाजून 30 मिनिटांनी, कुर्ला - पनवेल विशेष लोकल पहाटे 3 वाजता, कुर्ला - वाशी विशेष लोकल पहाटे 4 वाजता सुटणार आहे.

अप दिशेला वाशी - कुर्ला विशेष लोकल रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी, पनवेल - कुर्ला विशेष लोकल रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी आणि मानखुर्द - कुर्ला विशेष लोकल पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी चालवण्यात येणार आहे. प्रवाशांनी या लोकलचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा