आता रेल्वे स्थानकांवर फ्री टॉयलेट!

गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकांवरील मुत्रालय मोफत करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जात होती. अखेर, प्रवासी संघटनांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवरील सर्व स्थानकांवर नव्याने होणाऱ्या मुत्रालयांची सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जे मुत्रालय आहेत, तिथे मात्र प्रवाशांना एक रूपया हे नियमानुसार शुल्क द्यावे लागणार आहे. सध्याच्या कंत्राटदारांचे कंत्राट संपेपर्यंत हाच नियम लागू असेल.

प्रवासी संघटनांच्या मागण्यांचा पुनर्विचार

मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर पुरवण्यात येणाऱ्या सेवांविषयी स्थानिक खासदारांशी चर्चा करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांनी केलेल्या मागण्यांचा पुनर्विचार करण्यात आला. त्यानंतर संबंधित निर्णय घेण्यात आले.

काय आहे नवीन निर्णय?

मध्य रेल्वेवरील स्थानकांनाच हा नियम लागू

नवीन होणाऱ्या मुत्रालयांमध्ये सुविधा मोफत

सध्या अस्तित्वात असलेल्या मुत्रालयांमध्ये १ रूपया शुल्क

सध्याच्या कंत्राटदारांचं कंत्राट असेपर्यंतच शुल्क आकारणी

कंत्राट संपल्यानंतर ही मुत्रालयंही मोफत होणार

दरम्यान, महिला डब्यांमध्ये टॉयलेट बसवण्यात यावेत या मागणीचा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी यावेळी पुनरूच्चार केला. तसेच, एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील चर्चगेटच्या बाजूचा पादचारी पूल परेल स्थानकाला जोडण्याची मागणीही त्यांनी केली. या मागण्यांवर विचार सुरू असल्याचं रेल्वे सूत्रांनी सांगितलं.


हेही वाचा

म्हणून मध्य रेल्वे होते लेट!

पुढील बातमी
इतर बातम्या