Advertisement

खूशखबर! मध्य रेल्वेकडे आली हक्काची बम्बार्डिअर!


खूशखबर! मध्य रेल्वेकडे आली हक्काची बम्बार्डिअर!
SHARES

मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी खूशखबर आहे. गुरुवारी मध्य रेल्वेची हक्काची बम्बार्डिअर कुर्ल्याच्या कारशेडमध्ये दाखल झाली. ही नवी बम्बार्डिअर पुढच्या ८ ते १൦ दिवसांत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.



चेन्नईच्या कारशेडमधून ही लोकल थेट कुर्ल्याच्या कारशेडमध्ये दाखल झाली आहे. आतापर्यंत मध्य रेल्वेवर ४ बम्बार्डिअर लोकल धावत आहेत. त्या पश्चिम रेल्वेकडून देण्यात आल्या आहेत. पण, आता मध्य रेल्वेने नव्या वैशिष्ट्यांसह स्वत:ची बम्बार्डिअर लोकल खरेदी केली आहे.


काय आहेत वैशिष्ट्ये?

  • महिलांसाठी ३ ऐवजी ५ राखीव डबे
  • महिलांच्या प्रत्येक डब्यात ६ ते ८ सीसीटीव्ही
  • सर्व डब्यांमध्ये एलईडी लाइट्स
  • कार्बोनेट सीट्सऐवजी स्टेनलेस स्टील सीट्स
  • सर्व पंख्यांना स्टेनलेस स्टीलची जाळी
  • मोटरमनच्या केबिनमध्ये एसी

भविष्यात आणखी हक्काच्या काही बम्बार्डिअर्स मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होऊ शकतात, असं ही सांगण्यात आलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा