Advertisement

म्हणून मध्य रेल्वे होते लेट!

मध्य रेल्वेची लोकल सेवा नेहमीच उशिरा असते, अशी तक्रार प्रवाशांकडून ऐकू येते. कारण, त्याचा त्रास प्रवासी दररोज सहन करत असतात. मध्य रेल्वेवर सतत होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने धावत असतात. पण गाड्या उशिराने धावण्याचं तसंच एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे मध्य रेल्वेवर असणाऱ्या मोटरमनची संख्या!

म्हणून मध्य रेल्वे होते लेट!
SHARES

मुंबईकरांची लाईफलाईन म्हणजेच लोकल आतापर्यंत अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. पण, आता या लोकल नेमक्या उशिरा का धावतात ? याचं खरं कारण समोर आलं आहे.

मध्य रेल्वेची लोकल सेवा नेहमीच उशिरा असते, अशी तक्रार प्रवाशांकडून ऐकू येते. कारण, त्याचा त्रास प्रवासी दररोज सहन करत असतात. मध्य रेल्वेवर सतत होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिराने धावत असतात. पण गाड्या उशिराने धावण्याचं तसंच एक महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे मध्य रेल्वेवर असणाऱ्या मोटरमनची संख्या!


मध्य रेल्वेवर दररोज १,७३२ फेऱ्या

मध्य रेल्वेवर दररोज एकूण १७३२ फेऱ्या धावतात. पण, या फेऱ्यांसाठी मध्य रेल्वेकडे फक्त ६൦४ मोटरमन आहेत. रेल्वे प्रशासनाने मुळात ८३४ एवढी मोटरमनची संख्या मंजूर केली आहे. त्यामुळे, सध्या तरी २३० मोटरमनची कमतरता मध्य रेल्वेकडे आहे. त्यामुळे मोटरमन्संना अतिरिक्त काम करावं लागतं.


भविष्यात संपाचा इशारा?

या अतिरिक्त कामाच्या ताणामुळे मोटरमन संघटनेने दिवाळीत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. पण, तेव्हा सणासुदीचे दिवस आणि त्यातच एसटीचा संप असल्याकारणाने मोटरमन संघटनेने आपल्या निर्णयावरुन माघार घेतली. पण, परिस्थिती अशीच राहिली तर मोटरमन संपाचे हत्यार उपसण्याची शक्यता आहे.


म्हणून मोटरमनची संख्या कमी

असिस्टंट ड्रायव्हरपासून मोटरमन व्हायला जवळपास 10 ते 15 वर्ष लागतात. त्यानंतर तो उपनगरीय रेल्वे चालवायला सक्षम होतो. शिवाय मुंबईच्या गाड्यांची टेक्नॉलॉजी नवीन आहे. त्यामुळे आता मोटरमन हा इंजिनिअरच असायला हवा. शिवाय, त्याला सगळं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच मोटरमनसाठी मानसिक तयारीची चाचणी महत्त्वाची असते. यात अनेक जण अपयशी होतात. त्यामुळे मोटरमनच्या भरतीसाठी प्रशासनाने काही तरी करायला हवं, अशी प्रतिक्रिया रेल्वे तज्ज्ञ यशवंत जोगदेव यांनी दिली.

मोटरमनचा हा विषय गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा फक्त मोटरमनचा प्रश्न नाही. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एकूण ८൦ लाख मुंबईकरांचा प्रश्न आहे. काही दुर्घटना घडली, तर आपण मोटरमनला दोषी ठरवतो. पण, त्यांच्यावर होणारा अतिरिक्त ताण कधीच लक्षात घेत नाही. त्यामुळे त्यांचा ओव्हरटाईम बंद केला पाहिजे. रेल्वेमंत्र्यांनी या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा.

सुभाष गुप्ता, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघटना


१६ तास करावं लागतं काम

मध्य रेल्वेने लाखो प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेच्या फेऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यातच अपुरे मोटरमन आणि सतत होणाऱ्या तांत्रिक बिघाडामुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडते. मोटरमन जवळपास १६ तास काम करतात. रेल्वे चालवताना सिग्नल, क्रॉसिंग करणारे लोकं, तसंच प्लॅटफॉर्मवर देखील लक्ष द्यावं लागतं. आणि जर त्यांना अतिरिक्त कामामुळे मानसिक थकवा आला, तर दुर्घटना होण्याची शक्यता असते.



हेही वाचा

मध्य रेल्वेचा फुकट्यांना दणका, १३൦ कोटींचा दंड वसूल


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा