Coronavirua updates : बेस्टच्या कोरोनामृतांच्या वारसांना नोकरी

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतुकीत सेवा पुरवीणाऱ्या बेस्ट कामगारांमध्ये कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. बेस्टच्या काही कर्मचाऱ्यांच्या कोरोनाशी दोन हात करताना मृत्यू झाला आहे. त्यापैकी ४ कामगारांच्या वारसांना बेस्ट उपक्रमात नियुक्तीचा निर्णय जाहीर केला आहे.

बेस्टमधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या १०८ पर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी, शनिवारपर्यंत कोरोनाग्रस्त ४२ कामगार यशस्वी उपचारानंतर घरी परतले आहेत. मात्र अजूनही बेस्ट कामगारांच्या व्यथांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत कामगारांकडून व्यक्त होत आहे.

त्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या समस्या दूर न केल्यास सोमवारपासून कामगारांनी घरीच सुरक्षित राहण्याच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. बेस्ट कामगारांमध्ये असलेल्या चिंतेची दखल घेत उपक्रमाने या मृत पावलेल्या सहापैकी चार कामगारांच्या वारसांना सेवेत घेण्याचे शनिवारी जाहीर केले आहे. लवकरच उर्वरित कामगारांच्या वारसांना उपक्रमात दाखल करून घेतले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


हेही वाचा -

देशव्यापी लाॅकडाऊन ४.० लागू, काय सुरू, काय बंद? वाचा नवे नियम…

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या २० हजार पार, राज्यात एकाच दिवसांत सर्वाधिक २३४७ नवीन रुग्ण


पुढील बातमी
इतर बातम्या