टॅक्सी, रिक्षा वाहतुकीवरील बंदी उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबईत ककोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव मुंबईत असून, या पुार्श्वभूमीवर वाहतूक सेवा पूर्णपणे ठप्प आहे. मुंबईत अत्यावश्यक सेवाचं सुरु आहेत. प्रशासनानं नवीन नियम आणि कायदे लागू केल्यानं मुंबईतील रहिवाशांचे हाल होत असल्याचं आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी म्हटलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजय मेहता आणि परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांना पत्र पाठवत गलगली यांनी रिक्षा आणि टॅक्सींच्या वाहतुकीवर घालण्यात आलेली बंदी मागे घेण्याची विनंती केली आहे.

राज्यातील कोरोना व्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी जारी केलेल्या आदेशात राज्य सरकारनं रिक्षा आणि टॅक्सीवर बंदी घातली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. ऑटो आणि टॅक्सी वाहतुकीवर कडक बंदी घातली गेली आहे, तर आपत्कालीन परिस्थितीत मुंबईकर प्रवास कसा करतील? असा सवाल अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे. 

'लोकल ट्रेन, मेट्रो यासारख्या वाहतुकीचाही प्रश्न अद्याप सुटलेला नाही. बेस्ट बसेस फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांनाच सेवा पुरवतात. मात्र सामान्य मुंबईकरांना प्रवास करण्यास या दरम्यान मुभा देण्यात आलेली नाही. त्यातच सरकारनं रिक्षा आणि टॅक्सीवर बंदी घातली आहे. मुंबईतल्या सामान्य नागरिकांना प्रवास करण्यासाठी हा एकच पर्याय होता. कारण प्रत्येक नागरिकांकडे खासगी गाडी नसते', असं म्हटलं. आपत्कालीन परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत लोकांना रुग्णालयात जायचं असेल तर टॅक्सी आणि रिक्षांवर बंदी घातल्यास ते कसे जाणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.


हेही वाचा -

तर महाराष्ट्रात येण्याआधी, 'हे'सुद्धा लक्षात ठेवा… राज ठाकरेंचं योगींना सडेतोड प्रत्युत्तर

चेंबूरमध्ये होणार विशेष कोविड रुग्णालय


पुढील बातमी
इतर बातम्या