Advertisement

चेंबूरमध्ये होणार विशेष कोविड रुग्णालय

एम पूर्व विभागातील मानखुर्द हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्याच्या बाजूला असलेल्या एम पश्चिममधील स्थितीदेखील गंभीर होत आहे

चेंबूरमध्ये होणार विशेष कोविड रुग्णालय
SHARES
Advertisement

राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईतील अनेक भागात दिवसेंदिवस रूग्ण आढळून येत आहेत. यामध्ये चेंबूरचा पण समावेश आहे. कोरोनाचा मोठा फैलाव होत असलेल्या परिमंडळ ५ मधील एम पश्चिम वॉर्डातील चेंबूरमध्ये आता विशेष कोविड रुग्णालय सुरू होत आहे. हे विशेष कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे.

महापालिकेच्या सर्व परिमंडळांत कोरोनाचे रुग्ण रोज वाढतच आहेत. यामधील परिमंडळ ५ मधील स्थिती दिवसेंदिवस भीषण होत आहे.  एम पूर्व विभागातील मानखुर्द हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्याच्या बाजूला असलेल्या एम पश्चिममधील स्थितीदेखील गंभीर होत आहे. त्यामुळे चेंबूरमध्ये कोरोना रुग्णांवरील उपचारांसाठी विशेष रुग्णालय उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चेंबूरमधील जॉय हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उभी केली जात आहे.

लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांवर जॉय रुग्णालयात उपचार केले जात आहेत. कोरोना देखरेखीचे सीसीसी २ हे केंद्र तेथे असून, लक्षणे असलेल्या तसेच प्रकृती गंभीर बनलेल्या रुग्णांवरही तेथे उपचार होऊ शकतील. फुफ्फुसांच्या विकारांशी संबंधित एक तज्ज्ञ डॉक्टर तेथे असेल. तसंच ऑक्सिजन सिलिंडर व व्हेंटिलेटरही असतील. लवकरच हे ६० खाटांचं रुग्णालय कोरोना उपचारांसाठी पूर्णपणे तयार होणार आहे.हेही वाचा -

एमएमआरसीकडून २ कोविड दक्षता सुविधा केंद्रांची उभारणी
ताजच्या मोफत जेवणाची मुदत संपली, निवासी डॉक्टरांना घरून डबे आणण्याची सूचना


संबंधित विषय
Advertisement