best mini ac bus कोरोनाच्या भीतीनं प्रवासी टाळताहेत बेस्टच्या मिनी एसी बसचा प्रवास

आर्थिक तोट्यातून बाहेर पाडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने अनेक प्रयत्न केले. प्रवाशांना विविध सवलती देत प्रवाशी संख्या वाढवून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. परंतु, बेस्टला आर्थिक परिस्थितीला समोर जावं लागत होतं. त्यामुळं कर्मचाऱ्याचा पगार देणं बेस्टला कठीण झालं होतं. त्यामुळं यातून बाहेर पडण्यासाठी बेस्टनं आपल्या ताफ्यातील बसगाड्या वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बेस्ट उपक्रमाच्या सेवेत ६५० वातानुकूलित मिनी बसगाड्या आल्या असल्या तरी कोरोनामुळे या गाड्याच्या वापराबाबत वेगळाच वाद निर्माण झाला आहे. कोरोना संसर्गामुळे गाड्यामध्ये वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवण्यास प्रवासी, बेस्ट समिती सदस्यांचा विरोध आहे.

कोरोनाच्या भीतीने प्रवासीही या बसमधून प्रवास करणे टाळत आहेत. बेस्टकडून सध्या ३,२२४ बस चालवल्या जात असून दररोज ११ लाख ७२ हजार प्रवासी प्रवास करतात. टाळेबंदीआधी बेस्टची प्रवाशी संख्या ३० लाखांवर होती. कोरोनाचा संसर्ग सुरू होताच बेस्ट उपक्रमाने शासनाच्या नियमानुसार वातानुकूलित मिनी बसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवली व प्रवाशांसाठी बसमधील खिडक्या उघड्या ठेवून बस चालवण्यात आल्या. त्यावेळी पाच रुपये तिकीट आकारले जात होते. मात्र आता वातानुकूलित प्रवासासाठी सध्या पाच किलोमीटर अंतरासाठी सहा रुपये तिकीट असून साध्या बसचे पाच किलोमीटपर्यंतचे तिकीट पाच रुपये आहे.

उत्पन्नासाठी वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवून बस सेवेत आणल्या. परंतु वातानुकूलित यंत्रणेमुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक होऊ शकतो, अशी भीती प्रवासी व्यक्त करत आहेत. शासनाचा नियम असतानाही तो बेस्टकडून पाळला जात नाही. सायन ते चेंबूर असा बेस्टच्या ३५२ क्रमांकाच्या वातानुकूलित बसने प्रवास करताना यातील वातानुकू लित यंत्रणा सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले व प्रवाशांची संख्या पाहता हे धोकादायक ठरू शकते.


हेही वाचा -

Best Mini Ac Bus कोरोनाच्या भीतीनं प्रवासी टाळताहेत बेस्टच्या मिनी एसी बसचा प्रवास

व्हाॅट्स अॅपवर वरिष्ठांची बदनामी करणे पडले महागात


पुढील बातमी
इतर बातम्या