Advertisement

मनसेचा बेस्टला दणका, ५० टक्केच बिल भरण्याचं आवाहन

बेस्ट पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर मनसेचे संदीप देशपांडे यांनी हे आवाहन केलं आहे.

मनसेचा बेस्टला दणका, ५० टक्केच बिल भरण्याचं आवाहन
SHARES

‘बेस्ट’च्या वाढीव वीज बिलाबाबत मनसेच्या शिष्टमंडळानं शुक्रवारी बेस्टच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर, ‘बेस्ट’च्या ग्राहकांनी सध्या फक्त ५० टक्के वीज बिल भरावं, असं आवाहन मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केल आहे. गेले काही दिवस वाढीव वीज बिल सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे मनसेनं यात पुढाकार घेऊन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.  

मुंबई शहर परिसरातील बेस्टच्या वाढीव वीज बिलांच्या शकडो तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं विभागीय अभियंत्यांना देण्यात आल्या. “कुणाचेही वीज कनेक्शन कापण्यात येणार नाही. सध्या पन्नास टक्के बिल भरा आणि उर्वरित रिडींगनंतर भरा” असं आश्वासन विभागीय अभियंत्यांनी दिल्याचा दाव दावा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

“वाढीव बिलासंदर्भात बेस्टच्या विभागीय आयुक्तांशी चर्चा झाली. सध्या कुणाचेही विद्युत कनेक्शन कापले जाणार नाही असं त्यांनी सांगितले” हे संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.

हेही वाचा : ‘बेस्ट’च्या वीज कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या काळात काम करणं जातंय कठीण

काही दिवसांपूर्वी मनसेच्या शिष्टमंडाळाने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मंत्र्यांना वीज बील कमी करण्याबाबत पत्र दिलं होतं. ऊर्जामंत्र्यांसोबत झालेल्या या बैठकीला मनसे नेते अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील उपस्थित होते.



हेही वाचा

Electricity Bill: वीज बिल ५० टक्के माफ करा, विरारमध्ये जोरदार आंदोलन

Electricity Bill: थकबाकी असेल तरी वीज कापणार नाही, ऊर्जामंत्र्यांचं आश्वासन

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा