Advertisement

Electricity Bill: वीज बिल ५० टक्के माफ करा, विरारमध्ये जोरदार आंदोलन

वाढीव वीज बिलाच्या कारणावरून विरारमध्ये मराठी भारती संघटनेनं जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान संघटनेने वीज बिलाच्या रकमेत ग्राहकांना ५० टक्के सवलत देण्याची मागणी करण्यात आली.

Electricity Bill:  वीज बिल ५० टक्के माफ करा, विरारमध्ये जोरदार आंदोलन
SHARES

कोरोना संकटाच्या काळात वीज वितरण कंपन्यांकडून ग्राहकांना पाठवण्यात आलेल्या वाढीव वीज बिलामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात लोकांची नाराजी वाढू लागली आहे. याच वाढीव वीज बिलाच्या कारणावरून विरारमध्ये मराठी भारती संघटनेनं जोरदार आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान संघटनेने वीज बिलाच्या रकमेत ग्राहकांना ५० टक्के सवलत देण्याची मागणी करण्यात आली.

लाॅकडाऊनच्या काळात वीज वितरण कंपन्यांना प्रत्यक्ष मीटर रिडींग घेता न आल्याने वीज ग्राहकांना मागील वीज बिलाच्या सरासरीनुसार वीज बिल पाठवण्यात आलं आहे. लाॅकडाऊनच्या काळातील वीज बिल भरून देखील अनेकांच्या अव्वाच्या सव्वा वीज बिल पाठवण्यात आल्याने लोकं चक्रावून गेले आहे. अनेक व्यापाऱ्यांची दुकानं, आॅफिस बंद असून देखील त्यांना भरमसाठ वीज बिल पाठवण्यात आलं आहे. वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना तीन हप्त्यांमध्ये बिल भरण्याची सोय वीज वितरक कंपन्यांकडून देण्यात येत असली, तरी त्यावर व्याज आकारलं जात आहे. ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा म्हणावा तितक्या आश्वासक पद्धतीने होत नाहीय. यामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

हेही वाचा- Electricity Bill: थकबाकी असेल तरी वीज कापणार नाही, ऊर्जामंत्र्यांचं आश्वासन

वाढीव वीज बिलाविरोधात विरारमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनात मोठ्या संख्येने लोकं सहभागी झाले होते. सर्वांनी आपल्या हाती वीज बिल धरून वीज वितरण कंपन्यांचा निषेध नोंदवला. त्याचप्रमाणे वीज बिलात सवलत देण्याची मागणी देखील केली. 

यासंदर्भात मराठी भारती संघटनेच्या अध्यक्षा अॅड. पूजा बडेकर म्हणाल्या की, मागील काही दिवसांपासून आमची संघटना वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आवाज उठवत आहे. एका बाजूला लोकांच्या रोजगारावर गदा आली आहे, तर दुसऱ्या बाजूला लोकांना भरमसाठ वीज बिल पाठवण्यात आलं आहे. अशा स्थितीत लोकांनी ही वीज बिलं भरायची कशी, असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाचा विचार करून राज्य सरकारने २०० युनिटपर्यंतच वीज बिल माफ करावं आणि २०० युनिट पेक्षा जास्त असलेल्या वीज बिलात ५० टक्के सवलत देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. 

दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नुकत्याच घेतलेल्या बैठकीत थकीत वीज बिल असणाऱ्या ग्राहकांची वीज जोडणी कापू नये, असे निर्देश वीज वितरण कंपन्यांना दिले आहेत.  

हेही वाचा- Electricity Bill: अदानीचंही वीज बिल ३ हप्त्यात भरता येणार

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा