Advertisement

Electricity Bill: थकबाकी असेल तरी वीज कापणार नाही, ऊर्जामंत्र्यांचं आश्वासन

अन्यायकारकरित्या कुणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

Electricity Bill: थकबाकी असेल तरी वीज कापणार नाही, ऊर्जामंत्र्यांचं आश्वासन
SHARES

जूनमध्ये मागील ३ महिन्यातील वीज वापराचं बिल एकत्रितरित्या आल्याने वीज बिलाचे आकडे कमालिचे वाढले आहेत. यामुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आधीच आर्थिक विंवचनेत अडकलेल्या ग्राहकांना दिलासा देण्यासाठी वाढीव वीजबिलाबाबतच्या तक्रारीची पडताळणी करून शंकानिरसन केल्याशिवाय थकित वीजबिलप्रकरणी कारवाई करण्यात येणार नाही. तसंच अन्यायकारकरित्या कुणाचीही वीजजोडणी कापली जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. (shiv sena mla anil parab and energy minister nitin raut held meeting on electricity bill and power cut in maharashtra)

लॉकडाऊन कालावधीनंतर जून महिन्यात देण्यात आलेल्या वाढीव बिलांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी बुधवार १४ जुलै २०२० रोजी मंत्रालयात परिवहनमंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.

सामान्य ग्राहकांचा एकूण वापराच्या वीजेच्या बिलाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र सोडून त्या-त्या विभागात संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करावी आणि तिथं वीज बिलाची पडताळणी करून त्यांच्या तक्रारी सोडवण्यात याव्यात, असे निर्देश डॉ. राऊत यांनी बेस्ट, टाटा, महावितरण व अदानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

हेही वाचा - Electricity Bill: अदानीचंही वीज बिल ३ हप्त्यात भरता येणार

तसंच ग्राहकांना विजेचे बिल कशाप्रकारे देण्यात आलं याबाबतची माहिती देण्याचे निर्देशही डॉ. नितीन राऊत यांनी सर्व वीज पुरवठाधारक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना दिले. एकूण वापराच्या वीज बिलाबाबत आर्थिक सहाय्य करण्यात येईल का याबाबतही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत चर्चा केल्याची माहिती डॉ. राऊत यांनी दिली.

लॉकडाऊन शिथिल झाल्यावर प्रत्यक्ष रिडींग सुरू करण्यात आलं. राज्यात २ ते ३ टक्के ग्राहकांनी आपल्या मीटर रिडींगचे फोटो पाठवले. ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी झोन निहाय व्हाॅट्सप ग्रुप, हेल्प डेस्क, बाजाराच्या ठिकाणी ग्राहक मेळावे सुरू करण्यात आल्याची माहिती डॉ. राऊत यांनी उपस्थित आमदारांना दिली. 

यावेळी परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी, वीजबिलाबाबतच्या तक्रारींचं १०० टक्के निरसन करावं, कोणाही ग्राहकाला चुकीचं बिल भरायला लागू नये याची दक्षता वीज वितरण कंपन्यांनी घ्यावी; तक्रारींबाबत जलद प्रतिसाद पद्धतीने कार्यवाहीची यंत्रणा निर्माण करावी आदी सूचना केल्या.

यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, संचालक (संचालन) दिनेशचंद्र साबू, बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे, टाटा वीज कंपनीचे (वितरण) उपाध्यक्ष सुनील जोगळेकर, अदानी वीज कंपनीचे उपाध्यक्ष के. पटेल उपस्थित होते.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा