Ganpati 2022: कोकण रेल्वे मार्गावर धावणार अतिरिक्त 32 स्पेशल गाड्या

(File Image)
(File Image)

कोकणात चतुर्थीसाठी गावी जायला लोकांना अधिक सोपं जावं, यासाठी कोकण रेल्वेकडून स्पेशल गाड्यांची सोय करण्यात आली आहे. अतिरिक्त 32 स्पेशल गाड्यांच्या फेऱ्यांच्या वेळा, स्टेशन आणि डब्यांची रचना यात कोणताही बदल झालेला नाही.

गणेशोत्सवासाठीच्या गाड्यांमध्ये (Ganpati Festival Special Konkan Rail) वाढ करण्यात आली आहे. आधी 74 विशेष गाड्या गणपतीसाठी सोडण्यात आल्या होत्या. आता यामध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 106 विशेष गाड्यात कोकणात गणेशोत्सव (Ganpati Festival News) काळात धावणार आहेत. आजपासून या अधिकच्या गाड्यांचं बुकिंग सुरु होणार आहे.

या स्पेशल गाड्या सीएसएमटी ते सावंतवाडी, नागपूर ते मडगाव, पुणे ते कुडाळ, पुणे-कुडाळ/थिविम, पनवेल – कुडाळ / थिविम अशा चालवल्या जाणार आहेत. या गाड्यांसाठी बुकिंग 8 जुलैपासून सकाळी 8 वाजता सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलीय.

गणपती स्पेशल गाड्यांचे रिझर्वेशन विशेष शुल्कासह आजपासून ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकले. तिकीट काऊंटसह आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर प्रवाशांना तिकीट बुकींग करता येईल.

  • गाडी क्र. 01137 : मुंबई- सावंतवाडी दैनिक विशेष (16 फेऱ्या) ही ट्रेन 13 ते 20 ऑगस्टदरम्यान सीएसएमटीवरून दररोज रा. 12.20 वाजता सुटेल आणि दु. 2.00 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
  • गाडी क्र. 01138 : सावंतवाडी-मुंबई ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 13 ते 20 ऑगस्टदरम्यान दररोज सावंतवाडी रोड येथून दु. 2.40 वाजता सुटेल आणि सीएसएमटीला रात्री 3.45 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्र. 01143 : पनवेल-कुडाळ/थिविम (४ फेऱ्या) ही विशेष ट्रेन 14 ते 21 ऑगस्टदरम्यान पनवेल येथून पहाटे 5,00 वा. सुटेल आणि कुडाळला दु. 2.00 वाजता पोहोचेल.
  • गाडी क्र. 01144 : ही विशेष गाडी 13 ते 20 ऑगस्टदरम्यान थिविम येथून दु. 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री 2.45 वाजता पोहोचेल.


हेही वाचा

पठाणवाडी मेट्रो स्टेशनचे दिंडोशी नामकरण करण्याच्या याचिकेवर उत्तर देण्याचे आदेश

मुंबईच्या सर्व लोकल एसी होण्याची शक्यता, पीएमओकडून दिले हे आदेश

पुढील बातमी
इतर बातम्या