Advertisement

मुंबईच्या सर्व लोकल एसी होण्याची शक्यता, पीएमओकडून दिले हे आदेश

मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांना केंद्राकडून मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय.

मुंबईच्या सर्व लोकल एसी होण्याची शक्यता, पीएमओकडून दिले हे आदेश
SHARES

मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांना केंद्राकडून मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. मुंबई उपनगरीय रेल्वे संपूर्ण वातानुकूलित (AC Rail) करण्याच्या २० हजार कोटींच्या प्रकल्पाला प्राधान्य देण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाने (Prime Minister's Office) दिले आहेत. त्यासाठी लवकरच केंद्रीय अर्थखात्याची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबई उपनगरीय रेल्वे संपूर्ण एसी करण्याच्या 20 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाला प्राधान्य द्या, असे आदेश पीएमओकडून देण्यात आले आहे. त्यासाठी लवकरच आता केंद्रीय अर्थमंत्रालयाकडूनही मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वे संपूर्ण वातानुकूलित करण्यासाठी निविदा कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी २० हजार कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहेत. प्रकल्प निविदेसाठी सर्व कागदपत्रे तयार आहेत. अर्थ खात्याकडून मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतर तातडीने निविदा मागवण्यात येतील, असे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईतील एसी लोकलचा तिकीट दर महिन्याभरापूर्वीच कमी करण्यात आला होता. तिकीट दर जरी कमी केला असला, तरी मासिक पासच्या दरात बदल करण्यात आलेला नव्हता. मात्र एसी लोकलच्या तिकीट दरात कपात केल्यापासून पश्चिम रेल्वे मार्गावर लोकलप्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली होती.



हेही वाचा

सीएसएमटी ते गोरेगाव प्रवास होणार वेगवाग, 'हे' बदल केले

मुंबईकरांसाठी बेस्टची ई-बाईक सेवा, 'या' परिसरात उपलब्ध

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा