भीमा-कोरेगाव प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी मुंबईत हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी दाखल झाले होते. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वे मुंबई विभागाकडून विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
'या' आहेत विशेष गाड्या-
अ) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर साठी एक विशेष अनारक्षित गाडी 26.3.2018 रोजी रात्री 10.30 वा. सुटेल ज्यात 11 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे व दोन ब्रेक व्हॅन असतील.
आ) 4 गाड्यामध्ये सामान्य द्वितीय श्रेणीचे अतिरिक्त डबे जोडण्यात येतील - तपशील खालील प्रमाणे
1) गाडी क्र.12322 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -हावडा मेल व्हाया छिओकी - एक डबा भुसावळपर्यंत 26.3.2018 रोजी
2) गाडी क्र.17057 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेस - एक डबा मनमाडपर्यंत 26.3.2018 रोजी
3) गाडी क्र.18029 लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा एक्स्प्रेस-दोन डबे नागपूरपर्यंत 26.3.2018 रोजी
4) गाडी क्र.15017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्स्प्रेस व्हाया अलाहाबाद - एक डबा भुसावळपर्यंत 27.3.2018 रोजी

हेही वाचा-
८ दिवसांत भिडेंना पकडा, नाहीतर..., आंबेडकरांचं सरकारला अल्टिमेटम
संभाजी भिडे मोकाट का? विरोधकांचा सवाल