Advertisement

संभाजी भिडे मोकाट का? विरोधकांचा सवाल

संभाजी भिडे अजूनही सगळीकडे मोकाट फिरत आहेत. जाहीर पत्रकार परिषद घेऊनही ते पोलिसांना सापडत कसे नाही? यावरून राज्य सरकार भिडे यांना पाठीशी घालत असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला.

संभाजी भिडे मोकाट का? विरोधकांचा सवाल
SHARES

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांची नावे 'एफआयआर'मध्ये आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यास पोलिसांना अडीच महिने लागतात. तर संभाजी भिडे अजूनही सगळीकडे मोकाट फिरत आहेत. जाहीर पत्रकार परिषद घेऊनही ते पोलिसांना सापडत कसे नाही? यावरून राज्य सरकार भिडे यांना पाठीशी घालत असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानसभेत केला.

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे प्रश्न मांडला. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं.


मोर्चावर बंदी का घातली?

यावेळी विखे-पाटील म्हणाले की, भिडेंच्या कार्यक्रमांना सरकार परवानगी देतं. मात्र याच भिडेला अटक करायची वेळ आली की पोलिसांना तो सापडत नाही. भिडे यांना अटक करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एल्गार मोर्चा काढला असून या मोर्चाची दखल राज्य सरकार घेणार की नाही? असा सवाल करत त्यांच्या मोर्चावर राज्य सरकारने बंदी का घातली? असा सवालही त्यांनी केला.


सरकारला धमकी

विखे-पाटील यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबतचा मुद्दा उपस्थित करत एकबोटे, भिडे हे खुलेआमपणे पत्रकार परिषदा घेतात. तसंच त्या पत्रकार परिषदांमधून ते सरकारला धमकावतात. त्यांना भेटायला जिल्हाधिकारी, पोलिस अधिकारी जातात. यावरून सरकार त्यांना वाचवत असल्याचं दिसून येत असून त्यांना अटक कधी करणार? असा सवाल केला.

तर, रत्नागिरी येथील खेड तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची बाब राष्ट्रवादीचे बाळासाहेब कदम यांनी उपस्थित केला. या घटनेची नोंद राज्य सरकारने घेवून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी तशी सूचना राज्य सरकारला द्यावी अशी मागणी विरोधी सदस्यांनी केली.

त्यावर गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दोन्ही घटनांची दखल घेतल्याचं सांगितलं. याच सोबत अतिरिक्त पोलीस बळ तैनात करण्यात आल्याचं स्पष्ट केलं.



हेही वाचा-

भायखळ्याऐवजी आझाद मैदानावर कार्यकर्त्यांचा एल्गार

पोलिसांच्या चुकीमुळे वाहतूककोंडी- आंबेडकर



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा