Advertisement

पोलिसांच्या चुकीमुळे वाहतूककोंडी- आंबेडकर

मुंबई पोलिसांनी या भायखळा इथून मोर्चा काढण्यास ऐनवेळी परवानगी नाकारल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर जमू लागले परिणामी फोर्ट परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली आहे. पोलिसांच्या चुकीच्या भूमिकेमुळेच ही वाहतूककोंडी होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

पोलिसांच्या चुकीमुळे वाहतूककोंडी- आंबेडकर
SHARES

कोरेगाव-भीमा हिंचासारातील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना अटक व्हावी, या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भायखळ्यातील जीजामाता उद्यान ते विधान भवन असा एल्गार मोर्चा काढण्याचं निर्धार केला होता. परंतु मुंबई पोलिसांनी या भायखळा इथून मोर्चा काढण्यास ऐनवेळी परवानगी नाकारल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर जमू लागले परिणामी फोर्ट परिसरात प्रचंड वाहतूककोंडी होऊ लागली आहे. पोलिसांच्या चुकीच्या भूमिकेमुळेच ही वाहतूककोंडी होत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.


म्हणून परवानगी नाकारली

ठरवल्यानुसार हा मोर्चा भायखळा ते विधान भवन असा होणार होता. परंतु पोलिसांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुढं करत या मोर्चाला परवानगी नाकारली.


कार्यकर्त्यांची गर्दी

परिणामी सकाळी दादर, सीएसटीएम , भायखळा इथं उतरलेले कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. पोलिसांनी आझाद मैदानात सभा घेऊन भूमिका मांडण्याचं आवाहन प्रकाश आंबेडकर यांना केलं. त्यामुळे नक्की मोर्चा भायखळा इथून निघणार थेट आझाद मैदानात सभा होणार याविषयी संभ्रम निर्माण झाला. परिणामी रस्त्यावर एकवटणाऱ्या कार्यकर्त्यांनी गर्दी होऊ लागली आणि वाहतूककोंडीला सुरूवात झाली.


मोर्चा शांतपणे काढणार होतो

पोलिसांनी आम्हाला भायखळा इथून मोर्चा काढून दिला नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला. ठिकठिकाणाहून कार्यकर्ते आझाद मैदानाकडे यायला निघाल्याने सीएसटीएम, चर्चगेट, मरिन लाइन्स स्थानकावर गर्दी होऊ लागली आहे. पोलिसांनी आम्हाला मोर्चा काढण्यास परवानगी दिली असती, तर आम्ही रस्त्याच्या एका बाजूने शांतपणे मोर्चा काढला असता, जेणेकरून वाहतूककोंडीही झाली नसती.
- अॅड. प्रकाश आंबेडकर

भायखळ्याला पोहोचलेले अनेक कार्यकर्ते पुन्हा वाहनांनी आणि रेल्वेने सीएसटीम, आझाद मैदानाच्या दिशेने पोहचू लागले. यामुळे चर्चगेट स्थानक आणि सीएसटीम स्थानक परिसरातील कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे वाहतूककोंडी होऊ लागली. या प्रकाराला सर्वस्वी पोलिस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.



हेही वाचा-

आंबेडकरांच्या मोर्चाला पाठिंबा नाही- रामदास आठवले

मोदी दंगलखोरांच्या पाठिशी, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी आरोप

संभाजी भिडेला अटक करा, प्रकाश आंबेडकर यांचं सरकारला 'अल्टीमेटम'



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा