Advertisement

संभाजी भिडेला अटक करा, प्रकाश आंबेडकर यांचं सरकारला 'अल्टीमेटम'

पुणे सत्र न्यायालयानं एकबोटेंना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एकबोटेंविरोधात कारवाई झाली असली, तरी दुसरीकडे भिडेंवर कारवाई करण्याबाबत सरकार आणि पोलिस उदासीन असल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्याच अनुषंगानं आंबेडकर यांनी २६ मार्चपर्यंत भिडेंना अटक झाली नाही, तर भायखळा ते आझाद मैदान अशी मोर्चाची हाक दिली आहे.

संभाजी भिडेला अटक करा, प्रकाश आंबेडकर यांचं सरकारला 'अल्टीमेटम'
SHARES

कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटे यांचा जामिन अर्ज बुधवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानंतर एकबोटेंना अटक झाली आहे. पण त्याचवेळी दंगल प्रकरणातील दुसरे मुख्य आरोपी संभाजी भिडे यांच्याविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे संभाजी भिडेंचं काय? त्यांना अटक कधी होणार? असा प्रश्न भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. एवढंच नाही, तर २६ मार्चच्या आत भिडे यांना अटक झाली नाही, तर मुंबईत पुन्हा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करू, असं अल्टीमेटमही सरकारला दिलं आहे.

सरकार, पोलिस उदासीन

पुणे सत्र न्यायालयानं एकबोटेंना १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एकबोटेंविरोधात कारवाई झाली असली, तरी दुसरीकडे भिडेंवर कारवाई करण्याबाबत सरकार आणि पोलिस उदासीन असल्याने जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. त्याच अनुषंगानं आंबेडकर यांनी २६ मार्चपर्यंत भिडेंना अटक झाली नाही, तर भायखळा ते आझाद मैदान अशी मोर्चाची हाक दिली आहे.

कोण सहभागी होणार?

या मोर्चादरम्यान भिडेंना अटक झाली नाही, तर मुंबई सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. या मोर्चात कोरेगाव-भीमा शौर्य दिन प्रेरणा अभियानातील २५० संघटनेसह सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटना सहभागी होतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शिष्यवृत्ती सुरू करा

टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स संस्थेतील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सरकारकडून अचानक बंद करण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी नवीन अटी घालण्यात आल्या आहेत. ७५ टक्के उपस्थिती बंधनकारक करण्याबरोबरच उपस्थितीबाबत प्राचाऱ्यांचं लिखित पत्रही आवश्यक असणार आहे. त्यामुळे या अटी रद्द करत विद्यार्थ्यांना त्वरीत शिष्यवृत्ती सुरू करा, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे. या आंदोलनात शिष्यवृत्तीचा प्रश्नही उचलून धरण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा-

शिष्यवृत्ती बंद! 'टीस'च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच

भीमा-कोरेगाव हिंसाचार: दडपशाहीचं कोम्बिंग आॅपरेशन ताबडतोब थांबवा- प्रकाश आंबेडकर

भीमा-कोरेगाव हिंसाचार: मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक होणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा