Advertisement

भीमा-कोरेगाव हिंसाचार: मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक होणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन


भीमा-कोरेगाव हिंसाचार: मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडेंना अटक होणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
SHARES

भीमा-कोरेगाव दंगलीचा कट रचणाऱ्या मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी करत भारीप बहुजन महासंघासह २५० डाव्या-पुरोगामी संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र बंद केला होता. या बंदची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी प्रकाश आंबेडकर यांना भेटीसाठी बोलवालं होतं. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी एकबोटे आणि भिडे यांनी अटक करण्यात येईल आणि त्यांच्याविरोधात कारवाईही होईल, असं आश्वासन दिल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिलेल्या खास मुलाखतीत दिली. तर आता प्रत्यक्षात अटक कधी होते हेच आता पाहायचं असल्याचीही प्रतिक्रिया त्यांनी दिली.


गंभीर गुन्हे दाखल

१ जानेवारी रोजीच्या भिमा-कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद दुसऱ्या दिवशी, मंगळवारी मुंबईसह राज्यभर उमटले. त्यानंतर या हिंसाचाराच्या निषेधार्थ आंबेडकरी, डाव्या-पुरोगामी संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली. दरम्यान मंगळवारी सायंकाळी एकबोटे आणि भिडे यांच्याविरोधात पिंपरीत अॅट्राॅसिटी, खुनी हल्ला आणि दंगल घडवणे या आरोपाखाली पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर, महाराष्ट्र बंद पडल्यानंतर, राज्यात तीव्र पडसाद उमटल्यानंतरही भिडे आणि एकबोटे यांना अटक होत नसल्याने आंबेडकरी अनुयायांमधील संताप, राग आणखी वाढत चालला आहे.


कोम्बिंग आॅपरेशन थांबवणार

दरम्यान बुधवारी बंद मागे घेतानाच प्रकाश आंबेडकर यांनी आपण लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे स्पष्ट केलं होते. त्यानुसार गुरूवारी मुख्यमंत्र्यांनी आंबेडकरांना भेटीसाठी बोलावले होते. या भेटीत भिडे आणि एकबोटे यांच्या अटकेचे आश्वासन दिले आहे. तर भिमा-कोरेगाव हिंसाचारानंतर उमटलेल्या पडसादानंतर होणारे कोम्बिंग आॅपरेशन त्वरीत थांबवण्यात येईल, असंही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. तसेच न्यायालयीन चौकशीसाठी येत्या दोन-तीन दिवसांतच एक पॅनल जाहीर करण्यात येईल आणि त्यांना आमच्या मागणीनुसार क्रिमिनल आणि सिव्हिल अधिकार देण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा