Advertisement

शिष्यवृत्ती बंद! 'टीस'च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच

कमी उत्पन्न मर्यादा असलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 'टीस'मध्ये शिक्षण घेता यावं यासाठी केंद्र सरकारच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निधी देण्यात येत होता. मात्र हा निधी देणं सरकारने पूर्णत: बंदच केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेकडो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 'टीस'मध्ये शिक्षण घेणं अवघड झालं आहे.

शिष्यवृत्ती बंद! 'टीस'च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच
SHARES

टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमध्ये (टीस) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शुल्क आणि शिष्यवृत्तीचा निधी केंद्र सरकारने बंद केला आहे. या निर्णयाविरोधात येथील विद्यार्थ्यांनी मागील ३ दिवसांपासून आंदोलन सुरू केलं आहे. मात्र प्रशासन या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले आहेत.

विद्यार्थी संघटनांकडून पाठिंबा

या आंदोलनाला मुंबईतील राष्ट्रवादी, छात्र भारती, इतर डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे. यामुळे 'टीस'च्या विद्यार्थ्याचं आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शिक्षण घेणं अवघड

कमी उत्पन्न मर्यादा असलेल्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 'टीस'मध्ये शिक्षण घेता यावं यासाठी केंद्र सरकारच्यावतीने मागील अनेक वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या माध्यमातून निधी देण्यात येत होता. मात्र हा निधी देणं सरकारने पूर्णत: बंदच केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेकडो मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 'टीस'मध्ये शिक्षण घेणं अवघड झालं आहे.

'अशा' प्रकारे निषेध

सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी विद्यार्थी संघटनेच्या एकही विद्यार्थ्याने काॅलेजमधील लेक्चरला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे. 'टीस'च्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी छात्र भारती संघटना धावून आली आहे. या आंदोलनामध्ये छात्र भारतीच्या उडीमुळे आता विद्यार्थ्यांचं बळ वाढण्याची चिन्हे आहेत. सरकारने आपल्या मागण्याचा विचार करून तात्काळ शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्क पूर्ववत करावे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा